Coronavirus News : कोरोना रुग्णसंख्येचा आलेख दिवसागणिक उंचावत असताना आता पुन्हा एकदा महाराष्ट्रातही दहशतीचं वातावरण पाहायला मिळत आहे. तीन वर्षांपासून दहशत निर्माण केलेल्या कोरोनानं पुन्हा एकदा देशात हातपाय पसरण्यास सुरुवात केली आहे. नव्यानं समोर आलेल्या माहितीनुसार मागील 24 तासात देशात कोरोनानं 11 जणांचा बळी घेतला आहे. यामध्ये महाराष्ट्रातील चार रुग्णांचा समावेश आहे. (Coronavirus india Maharashtra records highest deaths in 2023 latest Marathi news )


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महाराष्ट्रामागोमाग चंदीगढ, दिल्ली, गुजरात, हरियाणा, राजस्थान, पाँडिचेरी आणि कर्नाटकमध्ये प्रत्येकी एका रुग्णाचा मृत्यू झाल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली आहे. 2023 या वर्षात पहिल्यांदच देशात मृतांची संख्या दोन अंकी आढळल्यामुळं आता प्रशासनाची चिंता वाढलीये. त्यातच नव्या रुग्णसंख्येतही झपाट्यानं वाढ होत असल्यामुळं आरोग्य यंत्रणा आता प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर भर देताना दिसत आहे. 



केंद्राच्या आकडेवारीनुसार मागील 24 तासात देशात कोरोनाचे 4 हजार 435 नवे रुग्ण आढळून आले. तर, एकूण सक्रीय रुग्णसंख्या 23 हजार 91 वर पोहोचली आहे. 


महाराष्ट्रातही परिस्थिती भीतीदायक...


तिथं देशभरात कोरोना रुग्णवाढ होत असतानाच महाराष्ट्रातही चित्र वेगळं नाही. मागील 24 तासांत राज्यात 711 नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. यामध्ये 4 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्यामुळं संकट आणखी गडद होताना दिसत आहे. एकाच दिवसात राज्यात कोरोना रुग्णांमध्ये तिपटीने वाढ झाल्यानं आरोग्य यंत्रणाही अलर्टवर आल्याचं पाहायला मिळत आहे.


हेसुद्धा वाचा : School Reopening : जून महिन्यात 'या' तारखेपासून सुरु होणार नवीन शालेय वर्ष, विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! 


सध्याच्या घडीला राज्यात सक्रीय कोरोना रुग्णांची संख्या 3 हजार 792 इतकी आहे. हे एकंदर चित्र पाहता विमानतळांवरही पुन्हा कोरोना चाचणी सुरु करण्यात आली आहे. यामध्ये मुंबई, पुणे आणि नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावरील चाचणीत 55 जण कोरोनाबाधित आढळून आल्याची माहिती मिळतेय. या प्रवाशांचे नमुने जिनोम सिक्वेंन्सिंगसाठी पाठवण्यात आले आहेत. दरम्यान, राज्यात सध्या साताऱ्यातच मास्कसक्ती लागू आहे. पण, कोविड परिस्थिती आणखी बिघडल्यास संपूर्ण राज्यात हा नियम लागू होण्यास वेळ लागणार नाही. त्यामुळं नागरिकांनी कोरोनाचे नियम पाळा असं आवाहन आरोग्य मंत्रालय सातत्यानं करत आहे.