मुंबई : भारतामध्ये कोरोना व्हायरसचा कहर (Coronavirus in India) दिवसेंदिवस वाढतच चाललाय. मंगळवारी देशभरात 1.61 लाखाहून अधिक केसेस नोंदवल्या गेल्या. नवीन केसेस सर्वात वेगाने वाढणाऱ्या 10 राज्यांची यादी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने (Union Health Ministry) जाहीर केली आहे. देशात या दहा राज्यांमधून एका दिवसात 80.8 टक्के केसेस  येत आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, छत्तीसगड, दिल्ली, कर्नाटक, तामिळनाडू, मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थान आणि केरळमध्ये दररोज केसेस वाढत असल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने मंगळवारी सांगितले.


मंगळवारी महाराष्ट्रात कोरोना व्हायरसचे (Coronavirus in Maharashtra) 60,212 नवीन रुग्ण आढळले आणि 281 जणांचा मृत्यू झाला. परिस्थिती लक्षात घेता राज्य सरकारने 14 एप्रिल रोजी रात्री 8 वाजल्यापासून 15 दिवसांचा राज्यव्यापी कर्फ्यू लागू करण्याची घोषणा केली आहे.



मंगळवारी राष्ट्रीय राजधानी दिल्लीत कोरोना विषाणूच्या संसर्गाची 13,468 नवीन घटना घडल्यानंतर आणि संसर्गामुळे 81 लोकांचा मृत्यू झाल्यानंतर साथीच्या आजारामुळे हे देशातील सर्वात जास्त प्रभावित शहर बनले आहे.


उत्तर प्रदेशातही सर्वात वाईट स्थिती आहे. या राज्यात कोरोनाच्या नव्या केसेस झपाट्याने वाढल्या आहेत. उत्तर प्रदेशात गेल्या चोवीस तासांत विक्रमी 18021 नवीन केसेस सापडल्या आहेत. तर 81 जणांचा मृत्यू झाला आहे.


छत्तीसगडमध्ये गेल्या 24 तासांत 15121 लोकांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. राज्यात आता संक्रमित लोकांची संख्या 4,71,994 आहे.


कर्नाटकात 8778  नवीन केसेस नोंदवल्या गेल्या असून 67 जणांचा मृत्यू देखील झाला आहे. केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण म्हणाले की, फेब्रुवारीच्या मध्यात कर्नाटकात दररोज 404 केसेस नोंदविल्या गेल्या. त्या वाढून आता 7700 झाल्या आहेत.


कोरोना व्हायरसमुळे तामिळनाडूवर गंभीर परिणाम झालाय. मंगळवारी राज्यात 6984 नवीन केसेस सापडल्या असून 18 जणांचा मृत्यू झालाय.


मंगळवारी मध्य प्रदेशात कोरोना विषाणूच्या संसर्गाची 8,998 केसेस नोंदवल्या गेल्यायत. तर गुजरातमध्ये कोरोना विषाणूच्या संसर्गाची 6690 केसेस नोंदवल्या गेल्या आहेत.