मुंबई : चीन आणि इटलीमध्ये कोरोना व्हायरसने धुमाकूळ घातला आहे. इतर देशांमध्ये देखील कोरोना व्हायरस पसरत चालला आहे. भारतात देखील कोरोना व्हायरस हळूहळू पाय पसरवत आहे. आतापर्यंत भारतात जवळपास २५० लोकांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. या महामारीला रोखण्यासाठी भारतातील अनेक शहरांमध्ये मॉल, सिनेमागृह आणि गर्दीची ठिकाणं बंद ठेवण्यात आली आहेत. अनेक शहरं पुढील काही दिवस बंद राहणार आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोरोना व्हायरसवर अजून कोणतीही लस मिळालेली नाही. जगभरातील देश यावर लस शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे सध्या तरी या व्हायरसच्या संपर्कात येवू नये इतकंच करता येवू शकतं. भारतात कोरोना सध्या दुसऱ्या टप्प्यात आहे. दुसऱ्या टप्प्यातच याचा नाश करण्याचा भारत सरकारचा प्रयत्न आहे. कारण तिसऱ्या टप्प्यात हा पोहोचला तर याला थांबवणं कठीण होणार आहे.


भारतात कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. 


१३ मार्चला ८९ रुग्ण
१४ मार्चला ९६ रुग्ण
१५ मार्चला ११२ रुग्ण
१६ मार्चला १२४ रुग्ण 
१७ मार्चला १३९ रुग्ण 
१८ मार्चला १६८ रुग्ण 
१९ मार्चला १९५ रुग्ण 
२० मार्चला २५० रुग्ण


कोरोनाचा वाढता धोका पाहता भारतात अनेक शहरांमध्ये लॉकडाउन सारखी स्थिती आहे. पंतप्रधान मोदींनी गुरुवारी देशाला संबोधित करत २२ मार्चला जनता कर्फ्यूची घोषणा केली आहे. सकाळी ७ ते रात्री ९ वाजेपर्यंत घराच्या बाहेर न पडण्याचं आवाहन पंतप्रधान मोदींनी देशवासियांना केलं आहे. 


२२ मार्चला जनता कर्फ्यू दरम्यान २४ तासासाठी रेल्वे सेवा देखील बंद राहणार आहेत.