मुंबई : कोरोना व्हायरस (Coronavirus) वरील लसीकरण मोहिमेला सुरूवात झाली आहे. जगभरात कोरोना लसीचं वाटप झाल्यानंतरही कोरोनाचं नवी लक्षणे समोर येत आहे. आतापर्यंत ताप, खोकला, सर्दी, घश्याला खवखव होणे यासारखी लक्षणे दिसत होती. आतापर्यंत कोरोनाची हीच लक्षणे समोर आली होती. पण आता आणखी एक कोरोनाचं लक्षण समोर आलं (Corornavirus New Symptoms) आहे. किंग्स कॉलेज लंडनचे प्रोफेसर टिम स्पेक्टरने 'कोरोना टंग' (Corona Tongue) हे कोरोनाचे नवे लक्षण असल्याचं समोर आहे. 


जीभेवर घाव, सुज आणि तोंडाचा अल्सर 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आरोग्य संबंधी गाइडलाइन आणि रोगाची लक्षणांवर तपास केल्यानंतर NHS चे अभ्यासक टिम स्पेक्टरने म्हटलंय की,'कोरोना टंग' (Corona Tongue) ला कोरोना व्हायरसचे लक्षण घोषित केलं आहे. कोरोनाचे हे नवे लक्षण समोर आल्यापासून यावर उपचाराचे संशोधन सुरू केले आहे. 


किंग्स कॉलेज लंडनचे प्रोफेसर टिम स्पेक्टर यांचा असा दावा आहे की, संक्रमित लोकांची वाढती संख्या पाहता जीभेवर व्रण, जीभेला सूझ आणि तोंडाचा अल्सर सारखी लक्षणे दिसत आहेत.  


आतापर्यंत फक्त तीन लक्षणांची घोषणा 


या लक्षणाचं ऑप्शन कोविड सिम्टम्स ट्रॅकर ऍपमध्ये नसल्यामुळे संक्रमित व्यक्तीची माहिती समोर येत नाही. ही माहिती सरकारपर्यंत पोहोचत नाही. डेली मेलच्या रिपोर्टनुसार प्रोफेसर स्पेक्टरने चेतावणी दिली आहे की, 20 टक्के संक्रमित लोकांची माहिती मिळत नाही. 



NHS सध्या कोरोनाच्या फक्त तीन लक्षणांनाच महत्व देत आहे. यामध्ये ताप, सतत खोकला आणि सर्दी तसेच कोणत्याही गोष्टीचा सुंगध न येणं ही महत्वाची लक्षणे समजली जात आहेत. यामुळे हीच लक्षणं असलेल्या रुग्णांना आयसोलेट केलं जात आहे. हीच तीन लक्षणं ज्या रुग्णांमध्ये आहेत त्यांची चाचणी केली जात आहे.