नवी दिल्ली : भारतातील कोविड -19 चाचण्यांच्या आकडेवारीने 1 कोटींचा टप्पा ओलांडला आहे. देशात आतापर्यंत १ कोटी लोकांच्या कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदने (ICMR) सोमवारी याबाबत माहिती दिली आहे. आतापर्यंत, सोमवारी सकाळी 11 वाजेपर्यंत देशात 1,00,04,101 चाचण्या घेण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारतात कोरोनाने शिरकाव केल्यापासूनच कोरोना टेस्टची सुरुवात झाली होती. देशातील विविध लॅबमध्ये कोरोनाची चाचणी केली जात होती. यापूर्वी सरकारने केवळ सरकारी लॅब आणि सरकारी रुग्णालयांनाच कोरोना चाचण्या घेण्यास परवानगी दिली होती. परंतु कोरोनाचे वाढते रुग्ण लक्षात घेता त्यांनी आपल्या निर्णयात बदल करत काही खासगी प्रयोगशाळांनाही कोरोना तपासणीसाठी परवानगी दिली. सोमवारी या कोरोना चाचण्यांनी 11 वाजता 1 कोटींचा आकडा ओलांडला आहे.


देशात आतापर्यंत एकूण 6,97,413 कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर कोरोनामुळे एकूण 19,693 लोकांचा मृत्यू झाला आहे. देशात आतापर्यंत 4,24,433 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून सध्या देशात 2,53,287 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. देशात कोरोनाबाधितांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असताना दुसरीकडे दिलासादायक बाब म्हणजे रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 80 टक्क्यांवर गेलं आहे. त्याचबरोबर देशातील सरासरी रुग्णांच्या रिकव्हरीचं प्रमाण 60.77 टक्क्यांच्या जवळ आहे.