आपल्याला लस नाहीय, आणि या लोकांना लस असून नकोय, त्यामुळे हजारो लसी थेट कचऱ्यात
भारतासह बर्याच देशांमध्ये कोरोना लसीची प्रचंड कमतरता आहे. आफ्रिकेतील बर्याच देश तर लसी मिळण्यासाठी लोकं आस लावून आहे. परंतु........
हाँगकाँग : भारतासह बर्याच देशांमध्ये कोरोना लसीची प्रचंड कमतरता आहे. आफ्रिकेतील बर्याच देश तर लसी मिळण्यासाठी लोकं आस लावून आहे. परंतु आपल्या शेजारी देश कोट्यावधी कोरोनाव्हायरस लसींना कचऱ्यात टाकण्याच्या तयारीत आहे. हाँगकाँग त्याच्या जवळच्या कोट्यवधी लसीं कचऱ्यात फेकून देणार आहे, अशी बातमी समोर येत आहे. कारण त्यांची एक्सपायरी डेट जवळ आली आहे. मंगळवारी अधिकाऱ्यांनी या बद्दलची माहिती दिली आहे.
हाँगकाँगच्या अधिकाऱ्यांनी म्हटले की, लोकं ही लस घेण्यासाठी नोंदणी करत नाहीत. यामुळे, ही परिस्थिती निर्माण झाली आहे. हाँगकाँग हा असा देश आहे, जेथे गरजेपेक्षा जास्त लस उपलब्ध आहेत. येथील लोकसंख्या सुमारे 75 लाख आहे. हाँगकाँग व्हायरसमुक्त व्हावे, यासाठी सरकारकडून करण्यात आलेल्या प्रयत्नांच्या अभावामुळे लोकं लस घेण्यास विचार करत असावेत असे म्हंटले जात आहे.
आता फक्त तीन महिने शिल्लक
त्यांच्याकडे उपलब्ध असलेली लस पुढील तीन महिन्यांसाठीच वापरी जाऊ शकते, असा इशारा सरकारच्या टास्क फोर्सच्या सदस्याने दिला आहे. यानंतर या लसी खराब होतील. या शहरात फाइजर-बायोएनटेक (Pfizer-BioNTech) लसीची पहिली तुकडी आता एक्सपायर होणार आहे.
सेंटर फॉर हेल्थ प्रोटेक्शनचे पूर्व कंट्रोलर थॉमस साँग म्हणाले की, सध्या जगभरात लसींची कमतरता आहे आणि अशा परिस्थितीत असे होणार नाही की, आम्ही ही लस विकत घेऊ आणि त्यांना फेकून देऊ.
आत्ता आमच्याकडे असलेली लस संपूर्ण वर्षासाठी पुरेसे आहे. हाँगकाँगने फायझर आणि चीनच्या सीनोव्हॅक कंपनीचे 75 लाख डोस खरेदी केले होते. परंतु अद्याप जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) ने चिनी लस मंजूर केलेली नाही.
आतापर्यंत फक्त 19 टक्के लोकांना लस
आतापर्यंत, हाँगकाँगमधील केवळ 19 टक्के लोकांना लसीचा पहिला डोस मिळाला आहे, तर 14 टक्के लोकांनी दोन्ही डोस घेतले आहेत. इथले आरोग्य कर्मचारी लस घेण्यासही टाळाटाळ करत आहेत. फायझरची लस अत्यंत कमी तापमानात ठेवावी लागते आणि ती सहा महिन्यांत खराब होते.