नवी दिल्ली : ईशान्य भारतातील मेघालय, नागालँड आणि त्रिपुरा या तीन राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकांसाठी उद्या मतमोजणी होतेय. मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर कडेकोट सुरक्षाव्यवस्था ठेवण्यात आलीय. त्यामुळे या निवडणुकांमध्ये कोण बाजी मारणार याकडं आता सा-यांच्या नजरा लागल्यात. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एक्झिट पोलनुसार तिन्ही राज्यात भाजपच सगळ्यात मोठा पक्ष म्हणून समोर येण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय. तर दोन एक्झिट पोल्सनी त्रिपुरामध्ये पंचवीस वर्षांनंतर सत्तांतर होत डाव्यांना फटका बसणार असल्याचा अंदाज वर्तवलाय. मेघालयमध्ये गेल्या दहा वर्षांपासून काँग्रेसचे सरकार आहे. तर नागालँडमध्ये 2003 पासून नागा पीपल्स फ्रन्ट सत्ता सांभाळतेय. 


तिन्ही राज्यांत विधानसभेच्या प्रत्येकी साठ जागा आहेत. मात्र कोणत्या ना कोणत्या कारणामुळे 59 जागांवर मतदान झालंय. त्रिपुरात 91 टक्के, मेघालयमध्ये 67 टक्के तर नागालँडमध्ये 75 टक्के मतदानाची नोंद झालीय.  सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होईल.