मुंबई : मॉडेल गुनगुन उपाध्यायला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. राजस्थानमधील जोधपूरमध्ये एका मॉडेलला आत्महत्येचा प्रयत्न करण्यास भाग पाडल्याप्रकरणी एका जोडप्याला अटक करण्यात आली आहे. भिलवाडा येथील एका मंत्र्याला हनीट्रॅपमध्ये अडकवण्यासाठी पती-पत्नीने मॉडेलला ब्लॅकमेल केले होते.


मॉडेलचा आत्महत्येचा प्रयत्न 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पोलिसांनी सांगितले की, अक्षत आणि दिपाली यांना उदयपूर येथून अटक करण्यात आली आहे. याआधी रविवारी, जोधपूरमध्ये छतावरून उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या मॉडेलने शुद्धीवर आल्यानंतर पोलिसांना निवेदन दिले.


मॉडेलवर मंत्र्यांना हनीट्रॅपमध्ये फसवण्याचा दबाव 


पोलिसानी सांगितले की, अक्षत आणि दिपाली याना उदयपूर येथून हल्ला करण्यत आली आहे. याआधी रविवार, जोधपूरच्या मध्यभागी छटाव्रून उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न कर्णया मॉडेलने शुद्धीवर आल्यानंतर पोलिसाना विनंती केली.


आपत्तीजनक व्हिडीओमार्फत केलं ब्लॅकमेल 


पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, पती-पत्नीने मॉडेल आंघोळ करतानाचा व्हिडिओ शूट केला होता आणि त्या आधारे ते दोघेही मंत्र्याला हनीट्रॅपमध्ये अडकवण्यासाठी तिच्यावर दबाव आणत होते. मॉडेलिंगच्या निमित्ताने ही मॉडेल या दोघांच्या संपर्कात आली.


अक्षत आणि दिपाली यांनी गेल्या आठवड्यात मॉडेलिंगच्या नावाखाली मॉडेलला भिलवाडा येथे नेले होते आणि त्यांनी तिला मंत्र्यासोबत झोपण्यास सांगितले होते. मात्र मुलीने तसे करण्यास नकार देत रविवारी जोधपूरला गेले. वाटेत मॉडेलने तिच्या वडिलांना आणि भावाला ही घटना सांगितली आणि ती आत्महत्या करणार असल्याचे सांगितले.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलीच्या वडिलांनी फोनवरून तिला घरी परतण्यासाठी समजावण्याचा प्रयत्न केला, मात्र जोधपूरला पोहोचल्यानंतर तिने हॉटेलच्या टेरेसवरून उडी मारली. ती खाली कारवर पडली पण वाचली.