मुंबई : जगात कोरोना बाधितांचा आकडा वाढत असताना भारतात तब्बल ४४ लाख ९० हजार लोक कोरोनामुक्त झाले आहेत. कोरोना रिकव्हरी रेटही ८० टक्क्यांच्या वर गेला आहे. केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी ही माहिती दिली. सोमवारी दिवसभरात तब्बल १ लाखांच्या वर रुग्णांना डिस्चार्ज मिळाला. 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महाराष्ट्रातही सोमवारी तब्बल ३२ हजारांच्या वर रुग्णांना डिस्चार्ज मिळाला. सध्या कोरोनाच्या रुग्णांमध्ये २२ टक्क्यांसह अमेरिका पहिल्या क्रमांकावर १७ टक्के रुग्णांसह भारत दुसऱ्या क्रमांकावर तर १४ टक्क्यांसह ब्राझील तिसऱ्या क्रमांकावर आहे. ७ जुलैपर्यंत भारतामध्ये १ कोटी टेस्ट करण्यात आल्या. 


जगभरात दहा लाख लोकांमागे १२३ मृत्यू होतायत. भारतात दहा लाख लोकांमागे ६४ मृत्यू होतायत. गेल्या चार दिवसांपासून नव्या रुग्णांपेक्षा कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या जास्त आहे. सध्या केल्या जाणाऱ्या कोरोनाच्या टेस्ट या भारतात तयार झालेल्या किटसमधूनच होतायत. मास्क लावण्याकडे मात्र लोक दुर्लक्ष करत आहेत.