कोरोनाचा नवा खतरनाक प्रकार उघड, काय आहे तो पाहा...
कोरोनाचा (Coronavirus) उद्रेक जगात दिसून येत आहे. दुसऱ्या लाटेत कोरोनाची नव नवी रूपे समोर आली आहेत.
मुंबई : कोरोनाचा (Coronavirus) उद्रेक जगात दिसून येत आहे. दुसऱ्या लाटेत कोरोनाची नव नवी रूपे समोर आली आहेत. कोरोनाचे भारतीय व्हेरियंट घातक असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर आता आणखी एक धक्कादायक बातमी पुढे आली आहे. कोरोनाचा नवा खतरनाक प्रकार उघड झाला आहे. (New dangerous type of corona revealed) 'डेल्टा प्लस' असा हा कोरोनाचा नवा प्रकार आहे. (Corona Delta Plus )
डेल्टा व्हेरियंटमधूनच डेल्टा प्लस किंवा एवाई.1 चं म्युटेशन होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. नव्या विषाणूचे संक्रमण झालेली प्रकरणं कमी आहेत. त्यामुळे भारताला चिंतेचं कारण नाही, असे शास्त्रज्ञाचे म्हणणे आहे. दरम्यान, कोरोनाच्या डेल्टा व्हेरियंटने आधीच संपूर्ण देशात हाहाकार माजवला होता.
कोरोनाचा अतिवेगाने संक्रमित होणारा डेल्टा व्हेरियंटमधून उत्परिवर्तित होऊन 'डेल्टा प्लस' किंवा 'एवाई.1' नावाचा नवा व्हेरियंट तयार झालेला आहे. भारतात या नव्या विषाणुंच्या व्हेरिएंटबद्दल भीती बाळण्याचे कारण नाही. कारण, या नव्या विषाणूचे संक्रमण झालेली प्रकरणे खूपच कमी आढळेली असल्याची माहिती शास्त्रज्ञानी दिली आहे.
दिल्लीतल्या सीएसआईआर-जिनोमिक आणि जीव विज्ञान संस्थेमधील शास्त्रज्ञ विनोद स्कारिया यांनी ट्विट केले आहे की, के-417 एन उत्परिवर्तनमुळे बी 1.617.2 प्रकार तयार झाला आहे. त्याला एवाई.1 नावानेदेखील ओळखले जाते. भारतात के-417 एनमधून 'डेल्टा प्लस' नावाचा प्रकार निर्माण झालेला आहे. मात्र, याचे जास्त प्रमाण नाही. हा नवा व्हेरियंट युरोप, आशिया आणि अमेरिकामध्ये मोठ्या प्रमाणात आढळून आल आहे.