Corona Cases in India: चीनमध्ये कोरोनाच्या (corona in china) नव्या व्हायरसने हाहाकार उडवला आहे. कोरोनामुळे चीनमध्ये अनेकांना आपला जीव गमवावा लागला. परिणामी कोरोनाचा पादुर्भाव भारतातही दिसू लागला आहे. अशा परिस्थितीत संसर्गाची प्रकरणे वाढल्यास पुन्हा लॉकडाऊन (lockdown) लागू होण्याची भीती काही लोकांना वाटत आहे. यावर एम्सचे माजी प्रमुख रणदीप गुलेरिया (AIIMS chief Randeep Guleria) स्पष्टीकरण दिले असून,  भारतात आंतरराष्ट्रीय उड्डाणांवर बंदी (international flights) घालण्याची किंवा लॉकडाऊन करण्याची गरज नाही. भारतात कोरोना (coronavirus) व्हायरसबाबत काळजी घेण्याची गरज असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. काही देशांमध्ये कोरोना रूग्णांच्या प्रकरणात वाढत आहेत. त्यामुळे लक्ष ठेवणे आवश्यक आहे. अशी माहिती डॉ. रणदीप गुलेरिया यांनी दिली आहे. 


भारताला लॉकडाऊनची गरज आहे का?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एम्सचे माजी संचालक रणदीप गुलेरिया म्हणाले की, कोरोना विषाणूची गंभीर प्रकरणे आणि रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्याची शक्यता नाही. कारण आपल्या देशातील लोकांमध्ये संकरित प्रतिकारशक्ती विकसित झाली आहे. डॉ. रणदीप गुलेरिया पुढे म्हणाले की, कोविड-19 च्या प्रकरणांमध्ये कोणतीही वाढ झालेली नाही आणि देश अजूनही चांगल्या स्थितीत आहे. सध्याच्या परिस्थितीत आंतरराष्ट्रीय उड्डाणांवर बंदी घालण्याची किंवा लॉकडाऊन लागू करण्याची गरज नाही.


वाचा : आज ख्रिसमसच्या दिवशी घराबाहेर पडणार असाल तर ही बातमी वाचा!    


BF.7 मुळे काय गंभीर परिस्थिती असेल?


डॉ. गुलेरिया यांच्या मते, कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी फ्लाइट्सवर बंदी घालणे परिणामकारक नाही, असे पूर्वीचे अनुभव सांगतात. आकडेवारीनुसार, Omicron चे BF.7 उप-प्रकार चीनमध्ये संसर्गाच्या झपाट्याने पसरण्यासाठी जबाबदार आहे आणि ते आधीच भारतात आढळले आहे. लॉकडाऊनबाबत ते म्हणाले की कोविड-19 चे गंभीर रुग्ण वाढण्याची शक्यता नाही आणि रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्याची शक्यता नाही.


चीनमधील अराजकतेच्या पार्श्वभूमीवर कोणती पावले उचलली पाहिजेत?


त्याचवेळी सफदरजंग रुग्णालयाचे डॉ. नीरज गुप्ता म्हणाले की, शेजारील चीन आणि इतर काही देशांमध्ये कोरोना विषाणूच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. परंतु आपल्या देशातील सध्याची परिस्थिती पाहता भारताने अधिक सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. नजीकच्या भविष्यात लॉकडाऊनची कल्पना केलेली नाही. तसेच संकरित प्रतिकारशक्ती व्यक्तीला भविष्यातील संसर्गापासून अधिक सुरक्षित करते.