चांगली बातमी, `कोरोनावरील `लस`ची किंमत कमी होणार, लसीचा तुटवडा नाही`
Corona Vaccination : देशात सध्या कुठल्याही राज्यात कोरोना लसीचा तुटवडा नाही, असे आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.
मुंबई : Corona Vaccination : कोरोना संसर्गावरील (coronavirus) रेमडेसिवीरची किंमत कमी होण्याची शक्यता आहे. रुग्णालयांच्या नफेखारीला आळा घालण्यासाठी अन्न आणि औषध प्रशासनाच्या हालचाली सुरू आहेत. दरम्यान, देशात सध्या कुठल्याही राज्यात कोरोना लसीचा तुटवडा नाही, असे आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. तसेच कोरोना 'लस'ची किंमत कमी करण्याबाबत कंपन्यांसोबत पुन्हा चर्चा करण्यात येत आहे. आम्ही सांगितलेली किंमत ही लक्षणीयरित्या कमी आहे, अशी माहिती राजेश भूषण (Rajesh Bhushan ) यांनी दिली.
सीरम इन्स्टिट्यूटची कोरोनावरील कोविशिल्ड ही लस आता 200 रुपयांहून कमी किमतीत मिळेल. सर्व कर वगळून एका डोसची किंमत 200 रुपयांहून कमी असेल, असे केंद्रायी आरोग्य मंत्रालयाने सांगितले आहे. खासगी रुग्णालयात मात्र 'लस'चा एक डोस सध्या 250 रुपयांना दिला जात आहे. तर सरकार आता सीरमकडून कोविशिल्ड 'लस'चा एक डोस सर्व कर वगळता 150 रुपयांहून कमी किंमतीत घेणार असल्याचे आरोग्य मंत्रालयातील सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.
देशात आतापर्यंतच्या लस देण्यात आलेल्या नागरिकांमध्ये 71 टक्के लसीकरण हे सरकारी केंद्रावर आणि 29 टक्के लसीकरण हे खासगी रुग्णालयाच्यामार्फत करण्यात आले आहे. देशात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असताना दुसरीकडे कोरोनावरील लसीकरण ( coronavirus vaccine ) मोहीमही वेगात सुरू आहे. कुठल्याही राज्यात लसीचा ( coronavirus vaccine update ) तुटवडा नाहीए, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सचिव राजेश भूषण ( rajesh bhushan ) यांनी दिली.
दरम्यान, महाराष्ट्रात कोरोनाची स्थिती गंभीर होत चालली आहे. वाढत्या रुग्णांमुळे केंद्र आरोग्य मंत्रालायाने चिंता व्यक्त केली आहे. तर देशात आज 22 हजारांहून अधिक नवीन रुग्ण आढळले आहेत. गेल्या 24 तासांत देशात 22,854 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. 18,100 जण कोरोनामुक्त झाले. तर 126 जणांचा करोनाने मृत्यू झाला आहे. देशातील कोरोनाच्या अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या आता एकूण 1 लाख 89 हजार 226 इतकी झाली आहे.
दरम्यान, अमेरिकेतील नव्या कायद्यामुळे लस निर्मितीसाठी ( covid vaccine ) तिथून आयात करण्यात येणाऱ्या कच्चा मालात अडचणी येत आहेत. यामुळे भारत सरकारने या प्रकरणी हस्तक्षेप करावा, अशी मागणी सीरम इन्स्टिट्यूटने केंद्र सरकारला पत्र लिहून केली होती. सरकारने वेळीच दखल न घेतल्यास कोरोना लसीचा तुटवडा निर्माण होऊ शकतो, असेही सीरमने पत्रात म्हटले होते. आता यावर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने स्पष्टीकरण दिले आहे. कोरोना लसचा तुटवडा भासणार नाही. कोरोना लस मुबलक प्रमाणात आहे. आतापर्यंत अडीच कोटींहून अधिक नागरिकांना कोरोनाची लस देण्यात आल्याचेही आरोग्य मंत्र्यालयाने सांगितले.