`या` दिवशी कोविड व्हॅक्सिनचा पहिला डोस, आरोग्यमंत्र्यांची माहिती
२०२१ च्या जानेवारी महिन्यात कोविड व्हॅक्सिनचा पहिला डोस
मुंबई : २०२१ च्या जानेवारी महिन्यात कोविड व्हॅक्सिनचा पहिला डोस देण्यात येईल असे मत आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी व्यक्त केलं. ANI ला दिलेल्या विशेष मुलाखतीत त्यांनी वैयक्तिक मत व्यक्त केलं. व्हॅक्सिन मोफत असेल का ? असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. हर्षवर्धन यांनी या प्रश्नाचं उत्तर देणं टाळंल. लसीकरण ऐच्छिक असेल असे हर्षवर्धन यांनी स्पष्ट केलं.
ऑगस्ट २०२१ पर्यंत कमीतकमी ३० कोटी जणांना लसीकरण करण्याचे प्लानिंग आहे. केंद्र राज्य सरकारांसोबत मिळून यावर काम करणार आहे. आंतरराष्ट्रीय कंपन्यांकडून वॅक्सिन खरेदी केली जाणार आहे. कोरोना वॅक्सिनेशन कार्यक्रमात नॅशनल एक्सपर्ट ग्रुपचे प्रमुख डॉ. विके पॉल यांनी यासंदर्भात माहिती दिली होती. भारतात कोरोनामुळे आतापर्यंत दीड लाखाहून अधिक मृत्यू झालेयत.
सीरमवर विश्वास
भारतात कोरोना वॅक्सिन जानेवारीपर्यंत पोहोचेल असे सिरम इंस्टिट्यूटने (Serum Institute of India)म्हटलंय. ऑक्टोबरपर्यंत देशातील सर्व गरजुंपर्यंत कोरोना लसीकरण पोहोचेल असे सीरम इंस्टीट्यूट ऑफ इंडियाचे प्रमुख अदार पुनावाला यांनी म्हटलंय. जानेवारीपर्यंत १० कोटींपर्यंत लसीकरण पोहोचेल असा दावाही त्यांनी केलाय.