मुजफ्फरनगर :  उत्तर प्रदेशच्या मुजफ्फरनगर जिल्ह्यात एका गाईने अनोख्या वासराला जन्म दिला आहे.  पण जन्माच्या एक तासानंतर या वासराचा मृत्यू झाला.  या वासराचे अर्धे शरीर मनुष्यासारखे आणि अर्धे वासरासारखे होते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या वासराचे डोळे, नाक आणि कान मनुष्यासारखा चेहरा आहे. त्यामुळे परिसरातील लोकांमध्ये हा कुतूहलाचा विषय आहे. ही बातमी आगीसारखी पसरल्याने लोक दूर वरून त्या अनोख्या वासराला पाहायला गर्दी करत आहे. 


सध्या या वासराचे मृत शऱीर एका काचेच्या पेटीत ठेवले आहे आणि लोक त्याची पूजा करत आहेत. 


 



का झाले असे.... 


स्थानिक या वासराला भगवान विष्णूचा अवतार मानत आहेत. त्यामुळे त्याला अजूनही दफन केले नाही. लोक असेही म्हणतात की त्याचे मंदिर बनविणार आहे. 


वाइल्ड लाइफ एसओएस वरिष्ठ पशूवैद्यक डॉक्टर अजय देशमुख यांनी सांगितले की, हा चमत्कार नाही, वासराचा शारिरीक विकास झाला नसल्याने ते असे जन्माला आले. 


गर्भात अनेकवेळा वासराच्या शरिराचे काही अंग संपूर्णपणे विकसीत होत नाही. त्यामुळे त्याला विचित्र चेहरा प्राप्त होतो. असाच प्रकार याठिकाणी झाला आहे. याला अंधविश्वासाशी जोडणे हास्यास्पद आहे.