मुंबई : आपल्या आजू-बाजूला असे अनेक लोक तुम्ही पाहिले असतील जे क्रेडिट कार्डचा वापर करतात. अगदी घरच्या किराणामालाच्या वस्तु घेण्यापासून ते इलेक्ट्रिक वस्तू घेण्यापर्यंत लोक  क्रेडिट कार्डचा वापर करतात. सुरुवातीच्या काळात फक्त जास्त पगार असलेले लोक किंवा श्रीमंत लोक क्रेडिट कार्डचा वापर करायचे. परंतु आता सर्वच लोकांकडे आपल्याला ते पाहायला मिळतं. ज्यामुळे क्रेडिट कार्ड वापर खूप वाढला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बँकिंग सेवेत अधिकाधिक लोकांची भर पडल्याने आणि पेमेंट सिस्टीममध्ये उपलब्ध असलेल्या, नवीन सुविधांमुळे क्रेडिट कार्ड बाजाराचा विस्तार झाला आहे. क्रेडिट कार्डद्वारे, ग्राहकांना अशा अनेक सुविधा मिळतात ज्या इतर कोणत्याही कार्ड किंवा पेमेंट सिस्टममध्ये नाहीत.


वेगवेगळ्या क्रेडिट कार्डमध्येही विविध प्रकारच्या सुविधा दिल्या जातात. हा लाभ क्रेडिट किंवा कर्जाच्या स्वरूपात उपलब्ध आहे. म्हणजेच तुमच्याकडे पैसे नसले तरी तुम्ही क्रेडिट कार्डचा वापर करुन पैसे काढू शकता आणि ठराविक वेळेत ते पुन्हा बँकेला किंवा त्या क्रेडिट कार्ड कंपनीला देऊ शकता.


परंतु मग असा प्रश्न उपस्थीत होतो की, वैयक्तिक कर्ज आणि क्रेडिटकार्ड यांमध्ये काय जास्त चांगलं आहे? कारण वैयक्तिक कर्ज देखील आपल्याला कर्ज देते आणि क्रेडिट कार्ड देखील. मग हे दोन्ही सारखे आहेत, का की वेगवेगळे आहे? 


चला तर मग आपण क्रेडिट कार्ड आणि वैयक्तिक कर्जाच्या बाबतीत काही गोष्टी समजून घेऊ, जेणे करुन तुम्हाला सोपं जाईल.


खरं तर या दोघांचा खरा उद्देश पैसा आणि पैशाची कमतरता दूर करणे हा आहे. परंतु खरंच खूप गरज असेल, तेव्हाच याचा वापर करा किंवा कर्ज घ्या, कारण उगाच कर्ज घेणं तुम्हाला महागात पडेल आणि तुम्ही कर्जाच्या जाळ्याक आणखी अडकत जाल.


क्रेडिट कार्ड आणि वैयक्तिक कर्ज यातील फरक


क्रेडिट कार्ड आणि वैयक्तिक कर्ज दोन्ही क्रेडिट प्रदान करण्यासाठी कार्य करतात. असे असूनही, दोघांमधील मोठा फरक हा आहे की क्रेडिट कार्डे कर्जासाठी पुन्हा पुन्हा वापरली जाऊ शकतात. तुम्ही तुमचे क्रेडिट कार्ड बिल भरता तेव्हा, तुम्ही पुढील कर्जासाठी किंवा पुढील खरेदीसाठी पात्र असाल. परंतु वैयक्तिक कर्जाच्या बाबतीत असे नाही. ते क्रेडिट कार्ड सारखे पुन्हा पुन्हा वापरले जाऊ शकत नाही.


वैयक्तिक कर्ज तुमच्या CIBIL स्कोअरवर अवलंबून असतो, तर क्रेडिट कार्ड कर्जाच्या बाबतीत असे होत नाही.
परंतु हे लक्षात घ्या की, क्रेडिट कार्ड कर्जाची परतफेड करण्यासाठी तुम्हाला तेवढा वेळ मिळत नाही जितका तुम्हाला वैयक्तिक कर्जासाठी मिळतो. त्यामुळे मोठी रक्कम तुम्हाला कर्ज म्हणून घ्यायची असेल जी तुम्ही एक किंवा दोन महिन्यात परत फेड करु शकत नाही, तर अशावेळी वैयक्तिक कर्जाचा मार्ग केव्हाही चांगला.


क्रेडिट कार्डवर कर्ज घेणे आणि त्याचे ईएमआयमध्ये रूपांतर करणे सोपे आहे. वैयक्तिक कर्जाच्या बाबतीतही हेच आहे, परंतु बँकांच्या अटी कठीण आहेत. व्याजदराची गणनाही जास्त आहे. आपण हे सर्व एका उदाहरणाने समजून घेऊ.


समजा तुम्हाला कुठेतरी सुट्टीसाठी जायचे आहे, त्यासाठी तुम्हाला तिकीट काढावे लागेल. तेव्हाच अचानक मुलाला स्मार्टफोनची गरज भासली, तो विकत घेणे अधिक महत्त्वाचे आहे. दरम्यान, परिस्थिती अशी आली आहे की, घरातील देखील काही छोटं मोठं काम आलं, ज्यामुळे तेथे देखील खर्च होणार आहे. अशावेळी तुम्हाला क्रेडिट कार्डचा अधिक फायदा होईल.


कारण हे सर्व खर्च तुम्ही तुमच्या क्रेडिट कार्डने करू शकता आणि पुढच्या महिन्यात जेव्हा पैसे येतील तेव्हा ते तुम्ही तुमच्या सोयीनुसार देऊ शकता. ट्रेनचे तिकीट किंवा विमानाचे तिकीट, मुलासाठी फोन किंवा घर बांधण्याचे साहित्य, हे सर्व क्रेडिट कार्डने करता येते, तेही कोणत्याही पैशाशिवाय.


सर्वात चांगली गोष्ट म्हणजे जर क्रेडिट कार्डवर जास्त खर्च झाले असेल आणि एकाच वेळेस ते पैसे भरणे कठीण वाटत असेल, तर ते ईएमआयमध्ये रूपांतरित करु शकता. ईएमआय तुमच्या सोयीनुसार असेल आणि घराचे बजेट विस्कळीत होणार नाही.


परंतु या अशा प्रकारच्या खर्चासाठी तुम्ही वैयक्तिक कर्ज घेऊ शकत नाही आणि असे जर केले, तर या कर्जाचा परिणाम तुमच्या CIBIL स्कोअरवर देखील होतो. तुम्ही वेळेवर कर्जाची परतफेड केली, तर काही फरक पडत नाही, परंतु काही कारणास्तव तुम्ही ते चुकवल्यास, एक वेळचे वैयक्तिक कर्ज तुमच्या भविष्यातील सर्व गोष्टींना हानी पोहोचवू शकतं. त्यामुळे कधीही विचार करुन आणि खरंच गरज असल्यावरच कर्ज घ्या.