मुंबई : क्रेडिट कार्ड आजच्या जगात अनेक जण वापरतात. क्रेडिट कार्ड वापरल्याने अनेक डिस्काउंट आणि रिवार्ड मिळत असतात. परंतु बहुतांश कार्ड युजर्स छोट्या छोट्या चूका करतात त्यामुळे त्यांचे बिल मोठे होते. तसेच अनेक कारणांमुळे त्यांचा सिबिल स्कोर खराब होतो. क्रेडिट कार्ड़ युजर्सने पुढील चुकांपासून दूर राहायला हवे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चुकूनही काढू नका एटीएममध्ये कॅश
जर तुम्ही क्रेडिट कार्ड वापरत असाल तर, क्रेडिट कार्डच्या माध्यमातून कधीही कॅश काढू नका. युजर्स क्रेडिट कार्डच्या माध्यमातून कॅश काढू शकतात परंतू कॅश काढल्यापासून युजर्सला 2.5 ते 3.5 टक्के प्रति महिना व्याज सुरू होते. एवढेच नाही तर, तुम्हाला Flat Transaction Tax सुद्धा द्यावा लागतो.


आंतरराष्ट्रीय ट्राजेक्शनपासून दूर रहा
जर तुम्ही क्रेडिट कार्ड परदेशातही वापरत असाल तर त्यासाठी तुम्हाला परदेशात फॉरेन ट्राजेक्शन फी भरावी लागेल. एक्सचेंज रेटच्या उतार - चढीचा त्यावर परिणाम होतो. 


30 टक्क्यांहून जास्त करू नका वापर
क्रेडिट मिळाल्यानंतर लोक बेहिशोबी वापर सुरू करतात. त्यांना कळत नाही की ते मर्यादेपेक्षा अधिक वापर करीत आहेत. मर्यादेपेक्षा जास्त खर्च करीत असाल तर कंपनी त्यावर देखील चार्ज लावते. जर युजर्स आपल्या मर्यादेच्या 30 टक्क्यांहून अधिक वापर करीत असतील तर त्यांचा सिबिल स्कोअर परिणाम होतो.


बिल भरताना वेळेकडे लक्ष द्या
क्रेडिट कार्ड युजर्सला माहित असते की, बिलमध्ये दोन प्रकारचे ड्यू अमाऊंट असतात. एक असते टोटल अमाऊंट ड्यू आणि दुसरे मिनिमम ड्यू. मिनिमम ड्यू कमी पैशांचा असतो. परंतु फक्त तो भरण्याची चूक करू नका. ड्यू डेट नंतरही तुम्ही कार्डचा वापर करू शकता. परंतू यामुळे कंपनी यावर जास्त व्याज लावू शकते. त्यामुळे शक्यतो नेहमीच टोटल अमाऊंट ड्यू भरा.


कर्ज फेडण्यासाठी कर्ज घेऊ नका
अनेक क्रेडिट कार्ड युजर्सला बँलेंस ट्रान्सफरची सुविधा देतात. म्हणजेच आपल्या एका क्रेडिट कार्डने दुसऱ्याच्या क्रेडिट कार्डचे पेमेंट करता येते. यामध्ये देखील युजर्सला व्याज भरावे लागते. कधी कधी पैशाच्या तंगीमध्ये हे फायद्याचे ठरते. परंतु याचा अर्थ हा नाही की, एका कार्डने दुसऱ्याचे, दुसऱ्याने तिसऱ्याचे बिल भरले जाणे. त्यामुळे तुमचा सिबिल स्कोअर खराब होऊ शकतो.