मुंबई : सध्याचा जमाना ऑनलाईनचा आहे. स्मार्टफोन आल्यापासून बहुतांश कामे ऑनलाईन केली जातात. ऑनलाईन व्यवहार करताना अनेकदा आपण डेबिट-क्रेडिट कार्डचा हमखास वापर करतो. प्रत्येकजण क्रेडिट-डेबिट कार्डचा वापर करतो. मोबाईल पेमेंटचा तर सर्रासपणे वापर केला जातो. क्रेडिट-डेबिट कार्डमुळे आर्थिक व्यवहार करणं सोपे झाले आहे. यासोबतच डेबिट कार्ड सुरक्षित ठेवणे आवश्यक असते. पण, डेबिट-क्रेडिट कार्ड हरवल्यावर आपली पाचावर धारण होते. अशावेळी काय करावे समजत नाही. आपल्या क्रेडिट-डेबिट कार्डमधून कॅश काढली जाण्याची भीती यावेळी सर्वाधिक असते. पण आता घाबरण्याची गरज नाही.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आपले हरवलेले क्रेडिट-डेबिट कार्ड मिळवण्यासाठी तुम्हाला एक प्रोटेक्शन प्लॅन घ्यावा लागणार आहे. कार्ड प्रोटेक्शन प्लॅन (सीपीपी) . ब्रिटनमधील कंपनी सीपीपी ग्रुप भारतात ही सुविधा उपल्बध करुन देत आहे. 


काय आहे सीपीपी CPP


१. डेबिट-क्रेडिट कार्ड हरवल्यावर त्या संदर्भात होणाऱ्या फसवणुकीला सीपीपी कव्हर करतो. 
२. कार्ड हरवल्यानंतर लगेचच आपण कॉल केल्यावर, क्रेडिट-डेबिट कार्ड ब्लॉक केले जाते. यामुळे आपल्या कार्डांचा गैरफायदा घेण्यास आळा बसतो. 
३. यासाठी कंपनीकडून एक हेल्पलाईन नंबर देण्यात आला आहे. ६०००४००० हा नंबर हेल्पलाईन नंबर असून, २४ तास ही सुविधा उपलब्ध असणार आहे.
४. हा नंबर लावण्याआधी, आपण ज्या शहारातून फोन करत आहोत, त्या शहराचा एसटीडी कोड टाकावा लागेल.


हे आहेत सीपीपीचे फायदे


ग्राहकांसाठी सीपीपीकडून काही विशेष सेवा देण्यात येणार आहेत. त्यात ग्राहकासाठी आपात्कालीन परिस्थितीत प्रवास, हॉटेल आणि रकमेची सोय केली जाणार आहे. प्रिमियम आणि प्लॅटीनम कार्ड सदस्यांना २० हजार तर क्लासिक मेंबर्सना कार्ड गहाळ झाल्यास ५ हजार इतकी रक्कम उपल्बध करुन दिली जाणार आहे. याव्यतिरिक्त ग्राहकाला कार्ड चोरी होण्याच्या १५ दिवसांआधी फिशिंग आणि ऑनलाईन फ्रॉड इन्शुरन्स कव्हर उपलब्ध करुन दिला जातो. या इन्शुरन्स कव्हरमध्ये रुपये ३ लाखांपर्यंतच दावा करण्यात येऊ शकतो.