अहमदाबाद : राजकारणाच्या मैदानात उतरण्याची तयारी करणाऱ्या भारतीय क्रिकेटपटू रवींद्र जडेजाची पत्नी रिवाबाची राजपूतांची संघटना असलेल्या करणी सेनेने गुजरात महिला प्रदेशाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. करणी सेना तेव्हा देशात चर्चेत आली होती जेव्हा त्यांनी दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या पद्मावती या सिनेमाला विरोध करत आंदोलन केलं होतं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राजकोटमध्ये एका कार्यक्रमात करनी सेनेचे अध्यक्ष महिपाल सिंह मकराणा यांनी याबाबतची घोषणा केली. जडेजाची पत्नी रिवाबा ही देखील यावेळी या ठिकाणी उपस्थित होती. महिला आणि मुलींना सशक्त करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणार असल्याचं यावेळी रिवाबाने म्हटलं. 


भारताचा ऑलराऊंडर रविंद्र जडेजाने २०१६ मध्ये रिवाबासोबत विवाह केला. या दोघांना एक मुलगी देखील आहे. जामनगरमध्ये एका अपघातादरम्यान पोलिसांनी रिवाबावर हल्ला केला होता. यावेळी या हल्याचा निषेध करत करणी सेनेने आंदोलन केले होते. त्यामुळे आता रिवाबा लवकरच राजकारणात येते का हे पाहावं लागेल.