Demolition in Haryana:कुविख्यात गुंडाविरोधात कारवाईचा बडगा उगारत त्यांच्याभोवतीचा फास आवळताना सरकार दिसत आहे. आता हरियाणातील खट्टर सरकाने कुख्यात गँगस्टारच्या तीन मजली इमारतीवरच बुलडोझर चालवला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हरियाणाच्या (Haryana News) मनोहर लाल खट्टर सरकारनेही आता उत्तर प्रदेशातील योगी सरकारचा मार्ग अवलंबला आहे. हरियाणातील कुख्यात गुंड सुबे गुर्जरवर ( Gangster Sube Gurjar) बुलडोझरची कारवाई (Bulldozer Action) करण्यात आली आहे. मानेसरमध्ये गुंडाने बांधलेले बेकायदेशीर घर मानेसर कॉर्पोरेशनच्या पथकाने (Bulldozer Action) पाडले आहे. महापालिकेच्या पथकाने शुक्रवारी बुलडोझरसह गुंडाच्या घरी पोहोचून तोडफोड केली. यापूर्वी गुरुवारीही गुर्जर याच्या घरावर बुलडोझरची कारवाई झाली होती. 


सलग दुसऱ्या दिवशी बुलडोझर फिरवला


मानेसर कॉर्पोरेशनच्या अधिकाऱ्याने सांगितले की, बेकायदेशीर गावच्या जमिनीवर गुंडाचे घर बांधण्यात आले होते. सुमारे साडेतीन हजार स्क्वेअर यार्डमध्ये हे घर बांधण्यात आले होते. गुरुवारीही येथे तोडफोड करण्यात आली होती. हे घर बांधण्यासाठी गुंडाने महापालिकेची कोणतीही मान्यता घेतली नाही. ते बेकायदेशीरपणे बांधलेले घर होते. त्यामुळे महापालिकेला बुलडोझरची कारवाई करावी लागली. यावेळी गावात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.


गुंड खातोय जेलची हवा


गँगस्टर सुबेसिंह गुर्जर याचे हरियाणा, दिल्ली, राजस्थान, उत्तर प्रदेश आणि पंजाबसह अनेक राज्यांवर वर्चस्व होते. तो 40 हून अधिक प्रकरणांमध्ये पोलिसांना हवा होता. हरियाणात 11 खून आणि 12 खुनाच्या प्रयत्नातील तो आरोपी आहे. सध्या तो त्याच्यावरील खटल्यांमध्ये शिक्षा भोगत आहे. तो सध्या भोंडसी कारागृहात आहे. 


15 वर्षांपासून गुन्हेगारीच्या जगात सक्रिय


विशेष म्हणजे गँगस्टर सुबे सिंह 2005 पासून गँगस्टर कौशलसोबत गुन्हेगारीच्या दुनियेत सक्रिय होता. या दोघांचा खून, खुनाचा प्रयत्न, खंडणी, धमकी अशा 40 हून अधिक घटनांमध्ये सहभाग होता. वर्षभरापूर्वी त्याला एसटीएफच्या पथकाने पकडले होते. सुबे सिंह हा मूळचा बडगुर्जर गावचा असून, जिथे ही बुलडोझर कारवाई झाली आहे.