आपल्या आजूबाजूला अनेक रहस्य लपलेले असतात. असाच एक धक्कादायक रहस्याचा उलगडा झालाय. मध्य प्रदेशातील मुरैना इथे एका नदीत एक कार सापडली. त्या कारची अवस्था पाहून साधारण चार पाच महिन्यापूर्वी ती नदीत पडली असेल असा अंदाज पोलिसांनी लावलाय. जेव्हा ही कार पाण्यातून काढण्यात आली. त्याचे दरवाजे उघडताच एका भयानक दृष्य पाहून सर्वांनाच धक्का बसला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या कारमध्ये दोन मानवीय सांगाडे सापडले आहेत. त्यातील एक पुरुष आणि एक महिलेचे आहे. गोपी गावात गुरुवारी कुवारी नदीत एक कार बुडल्याच दिसून आली. ग्रामस्थांनी ही माहिती पोलिसांना दिली. रेस्क्यू टीम आणि पोलीस घटनास्थळी पोहोचले. रेस्क्यू टीम आणि जेसीबीच्या मदतीने ती कार नदीबाहेर काढण्यात आली. यात मिळालेल्या सांगडामुळे गावात एकच खळबळ माजली. 


पोलिसांनी गावकरांची विचारपूस केली असता. पुरुष सांगाडा दीर आणि महिला सांगाडा वहिनीचा आहे, असं प्रथमदर्शीनय समोर आलंय. हे दोघे पोळ्याचा पुराचे रहिवासी होती. नीरज सखवार हा मिथिलेशचा दत्तक मेहुणा होता. दोघांमध्ये प्रेमसंबंध असल्याचे गावकऱ्यांकडून सांगण्यात आले. तर हे दोघेही फेब्रुवारी महिन्यात घरातून अचानक बेपत्ता झाल्याचही गावकऱ्यांनी पोलिसांना चौकशीदरम्यान सांगितलं. 


या दोघांची खूप शोधाशोध करण्यात आली, ते घरातून पळून गेले असाच समज गावकऱ्यांचा झाला होता. पण नदीत पाणी कमी झाल्यामुळे ही कार गावकऱ्यांच्या नजरेस पडली आणि ही घटना समोर आली. नदीतील पाण्याची पातळी वाढली असती तर हा घटनेचा छडा लागला नसता. 


या दोघांनी आत्महत्या केलीय की कोणी त्यांची हत्या याचा छडा पोलीस लावत आहेत. पोलीस प्रत्येक कोनातून या प्रकरणाचा तपास करत असून मृतांच्या कुटुंब आणि गावकऱ्यांची पोलीस कसून चौकशी करत आहेत. लवकरच या मृत्यूचे रहस्य उलगडणार पण भावजय आणि मेहुणीचा लव्ह स्टोरीचा भयावह अंत झाला.