Bhilwara Crime News : राजस्थानच्या भिलवाडा शहरातील एका प्रसिद्ध रुग्णालयात काम करणाऱ्या डॉक्टरवर एका मध्यमवयीन महिलेने विनयभंग (Doctor molested woman) केल्याचा आरोप केला आहे. त्याचबरोबर बलात्कारासारखे गंभीर आरोप करत गुन्हा दाखल केला आहे. महिलेला 6 तासांहून अधिक वेळ पोलीस ठाण्यात येऊनही महिलेला अहवाल दिला गेला नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या भाजप नेत्यांनी प्रथम सुभाष नगर पोलीस ठाणे आणि नंतर महात्मा गांधी रुग्णालयात जाऊन महिलेची वैद्यकीय तपासणी करून घेतली. त्यानंतर महिलने सर्वांना आपबिती सांगितली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पीडित महिलेकडून मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी तिच्या अल्पवयीन मुलीला श्वासोच्छवासाचा त्रास होत होता. त्यामुळे तिने थेट रुग्णालय गाठलं. आजाराची तक्रार घेऊन तिने राजस्थानच्या प्रथम नेहरू रोडवरील एका खासगी रुग्णालयात गेली. त्यानंतर तिने बांगर रुग्णालयात काही तपासण्य़ा करून घेतल्या. तेथे तिच्या तपासणीनंतर काही चाचण्या करण्यात आल्या. डॉक्टर पवन ओलाकडून चेकअप आणि काही चाचण्या करण्यात आल्या. त्यानंतर डॉक्टरने पुन्हा दुपारच्या वेळात पुन्हा बोलावलं. काही चाचण्या असतील असं समजून पिडीतेने मुलीला घेऊन पुन्हा रुग्णालय गाठलं. 


पिडीतेचा नंबर येताच डॉक्टरने इतर रुग्णांना त्यांच्या खोलीतून बाहेर जाण्यास सांगितलं. तसेच अप्लवयीन मुलीला देखील चेंबरच्या बाहेर बसण्य़ास सांगितलं. त्यानंतर पिडीतेची तपासणी करण्याच्या बहाण्याने तिचा विनयभंग केला.  नंतर डॉक्टरने माझ्यावर बलात्कार केला, असा पिडीतेचा आरोप आहे.  पीडितेच्या म्हणण्यानुसार, रुग्णालयात यावेळी तेथे एकही महिला वैद्यकीय कर्मचारी किंवा गार्ड उपस्थित नव्हती. त्यावेळी घाबरलेल्या महिलाने ही घटना कोणालाही सांगतली नाही. बाहेर आल्यानंतर ती मेडिकल स्टोअरमधून औषध घेऊन गावी गेली.


आणखी वाचा - Video : वंदे भारतच्या रेल्वेमार्गावर दगड ठेवून घातपाताचा प्रयत्न; धक्कादायक व्हिडीओ समोर!


दरम्यान, रविवारी पीडिता तिच्या कुटुंबासह भिलवाडा सुभाषनगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यासाठी पोहोचली. रात्री 3:00 वाजता अहवाल देऊनही पोलिसांनी रात्री 8:00 नंतरही गुन्हा नोंदवला नसल्याचा आरोपही महिलेने केला. दोन्ही पक्षांमध्ये अनेक तास चर्चा झाली, त्यानंतर पीडितेने गुन्हा नोंदवण्याचा निर्णय घेतला, त्या आधारावर सध्या सुभाष नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.