Vande Bharat Express Accident attempt : ओडिसामध्ये झालेल्या कोरोमंडल एक्सप्रेसच्या (Railway Accident) अपघातामुळे संपूर्ण देश हादरला होता. या अपघातात 275 पेक्षा जास्त प्रवाशांचा मृत्यू झाला अन् साधारण 1100 प्रवासी जखमी झाले होते. अशातच याच तीव्रतेचा मोठा अपघात करण्याचा मोठा डाव उधळून लावण्यात आला आहे. उदयपूर-जयपूर वंदे भारत एक्स्प्रेसच्या (Vande Bharat Express) चालकांमुळे मोठा अपघात टळला. लोकोमोटिव्ह चालकांनी आपत्कालीन ब्रेक लावले आणि अनेकांचे प्राण वाचले आहेत. ट्रेनच्या मार्गावरील (Udaipur-Jaipur) भीलवाडाजवळ रेल्वे ट्रॅकवर अज्ञातांनी दगड अन् लोखंडी रॉड रचले होते.
सध्या व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये रेल्वे कर्मचारी ट्रेनमधून खाली उतरून दगड हटवताना दिसत आहेत. या व्हिडीओमध्ये काही ठिकाणी लोखंडी रॉड देखील उभे खेचलेले दिसत आहेत. दगडांबरोबरच लोखंडी कडीही दिसतात. त्यावरून रेल्वे धावली असती तर मोठी दुर्घटना घडू शकली असती. मात्र, चालकाच्या सतर्कतेमुळे अनेकांचे जीव वाचले आहे. चालकाने एमर्जन्सी ब्रेक लावले अन् मोठा घातपात होण्यापासून वाचवलं आहे.
Alert train drivers stop #VandeBharatExpress in time. Stones and clips to derail Udaipur-Jaipur #VandeBharat near Bhilwara. pic.twitter.com/vftHAtZpMw
— Rajendra B. Aklekar (@rajtoday) October 2, 2023
दरम्यान, 24 सप्टेंबरपासून उदयपूर-जयपूर वंदे भारत स्पेशल ट्रेनला उदयपूर येथून हिरवा झेंडा दाखवण्यात आला होता. ही गाडी उदयपूर, चित्तोडगड, भिलवाडा, अजमेर आणि जयपूर या राज्याच्या पाच जिल्ह्यांतून जाते. किशनगड, अजमेर, भीलवाडा, चंदेरिया, मावली जंक्शन आणि राणा प्रताप नगर स्थानकावर थांबते. वंदे भारत एक्स्प्रेस उदयपूरपासून सकाळी 7.50 वाजता सुटते आणि जयपूरला दुपारी 1.50 वाजता पोहोचते. त्यानंतर जयपूरहून दुपारी 4 वाजता निघते आणि रात्री 10 वाजता उदयपूरला पोहोचते.