Crime News Extra Marital Affair: उत्तराखंडमधील देहरादूनमध्ये विवाहबाह्य संबंधांमधून हत्या घडवून आणल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका लग्नसमारंभाला गेलेली माहिला तेथील मिठाईवाल्याच्या प्रेमात पडली. त्यानंतर या दोघांनी मिळून या महिलेच्या पतीची हत्या केली. या गुन्ह्यासंदर्भातील खुलासा झाल्यानंतर पोलीसही चक्रावले आहेत. तर या महिलेच्या नातेवाईकांबरोबर तिच्या सासरच्या मंडळींनाही मोठा धक्का बसला आहे. पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली आहे.


अज्ञात मृतदेह सापडला


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

डाकपत्थर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील जलालिया पीर परिसरामध्ये यमुना नदीमध्ये 19 तारखेला एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. पोलिसांना यासंदर्भातील माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी पंचनामा केला. मात्र या मृतदेहाची ओळख पटू शकली नाही. या मृत व्यक्तीच्या गळ्यावर काही ओरखडे पोलिसांना दिसले. 


सीसीटीव्हीमधून सापडला पुरावा


पोलिसांना काही दिवसांनी हा मृतदेह अरुण कुमार उर्फ जुगनूचा असल्याचं समजलं. यानंतर अरुणचा भाऊ नितिनच्या तक्रारीच्या आधारे अज्ञात व्यक्तींविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला. देहरादूनचे एसएसपी अजय सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणाचा तपास सुरु केल्यानंतर तपास करण्याऱ्या टीमला सीसीटीव्ही फुटेजमध्ये पहिला पुरावा सापडला. पोलिसांनी हजारो सीसीटीव्ही फुटेज तपासून पहिले असता उत्तर प्रदेशमधील अमरोहा येथे राहणाऱ्या परम सिंह उर्फ गुड्डूवर पोलिसांना संशय आला. तपासादरम्यान आरोपीने आपला गुन्हा मान्य केलं. 


तिनेच सांगितलं पतीचा काटा काढू


परम सिंहने दिलेल्या माहितीनुसार, त्याचा मिठाईचा व्यवसाय आहे. मृत अरुणची पत्नी रमिता आणि आपली पहिली भेट एका लग्नात झाली होती. त्यानंतर आम्हा दोघांमधील जवळीक वाढली, असं परम सिंहने पोलिसांना सांगितलं. प्रेमात पडलेल्या रमिता आणि परम सिंह यांनी अरुणचा काटा काढण्याचं ठरवलं. रमिताच आपल्यावर अरुणीची हत्या करण्यासाठी दबाव टाकत होती असं परम सिंहने पोलिसांना सांगितलं. तसेच आपल्या पतीचा काटा काढला नाही तर मी तुला चांगलीच अडकवेन, अशी धमकीही रमिताने दिल्याचा दावा परम सिंहने केला. त्यामुळे त्याने रमिताच्या मदतीने अरुणच्या हत्येचा कट रचला.



...अन् हत्या केली


18 ऑक्टोबर रोजी अरुणला फोन करुन परम सिंहने त्याला भेटायला बोलावलं. अरुणला दारु पाजून नंतर त्याला गळा दाबून हत्या करण्यात आली. परम सिंहने अरुणचा मृतदेह यमुना नदीत फेकून दिला. अरुणची हत्या केल्यानंतर परम सिंहने रमिताला फोन करुन ठरल्याप्रमाणे तुझ्या पतीचा काटा काढला आहे असं सांगितलं. त्यानंतर ही रमिताने हिमाचलला पळून जाण्याचा प्रयत्न करत होती. मात्र ती पळून जाण्याआधीच पोलिसांनी तिला अटक केली. आता या दोघांचीही कसून चौकशी केली जात आहे.