सावत्र बाप आणि सख्या आईची 4 वर्षांच्या मुलाला अमानुष माराहाण, तडफडून जीव सोडला
Crime News Today: नात्याला काळिमा फासणारी एक घटना घडली आहे. सावत्र बापाने आणि सख्या आईनेच पोटच्या मुलांला अमानुष माराहण केली त्यातच त्याचा मृत्यू झाला आहे.
Crime News Today: आई सारखे दैवत साऱ्या जगतात नाही, असं आपल्या समाजात शिकवण दिले जाते. मात्र, नात्याला काळिमा फासणारी एक घटना घडली आहे. छत्तीसगढच्या दुर्गमध्ये हृदयद्रावक घटना घडली आहे. एका आईनेच आपल्या 4 वर्षांच्या मुलाला अमानुष मारहाण केली. दुसऱ्या नवऱ्याच्या मदतीने महिलेने तिच्या मुलाला जबर मारहाण केली. त्यात गंभीर जखमी झालेल्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. पोलिसांनी या प्रकरणी मुलाच्या आई-वडिलांना हत्येच्या प्रकरणी अटक केली आहे.
आईने व सावत्र पित्याने चार वर्षांच्या चिमुकल्याला अमानुष माराहण केली. ही घटना दुर्ग जिल्ह्यातील कुम्हारी परिसरात घडली आहे. महिलेने तिच्या दुसऱ्या पतीच्या मदतीने मुलाला दुर्दैवी मृत्यू दिला आहे. दोघा पती पत्नीने मुलाला लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. मुलाच्या पोटातही लाथा मारल्याची माहिती समोर येतेय. त्यातच त्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
आरोपी महिलेचे नाव गायत्री साहू असं असून तिचे वय 28 वर्षे इतके आहे. तर, सावत्र वडिलांचे नाव मनप्रीत सिंह असून त्याचे वय 26 वर्षे इतके आहे. जवळपास 8 महिन्यांपूर्वी मनप्रीत आणि गायत्रीने लग्न केले होते. त्यानंतर दोघही भाड्याच्या घरात राहत होते. गायत्रीसोबत तिचा 4 वर्षांचा मुलगा व 8 वर्षांची मुलगी राहत होते. मात्र मनप्रीत त्याचा सावत्र मुलगा जगदीप सिंहला दररोज मारहाण करत असे.
मनप्रीत मुलाला रोज मारहाण करत असल्याने त्याच्या घर मालकाने त्याला घर खाली करण्यास सांगितले. त्यानंतर ते लोक दुसऱ्या ठिकाणी राहायला गेले. मात्र तिथेही रोज तसेच घडत होते. मनप्रीत सतत मुलाला मारहाण करत असायचा. 31 जानेवारी रोजी आरोपी आई आणि सावत्र वडिल यांनी मुलाला अमानुष मारहाण केली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी मुलाच्या पोटात दुखायला लागले. दुखणं असह्य झाल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरू असताना त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.
मुलाच्या मृत्यूनंतर दोघांनीही कोणाला न कळवता मुलाचा मृतदेह घरी आणला आणि अंत्यसंस्कारांची तयारी करण्यात आली. मात्र, त्याचवेळी शेजाऱ्या सर्व घटना घडली आणि त्यांनी पोलिसांना याची माहिती दिली. घटनेची माहिती कळताच कुम्हारी पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी मुलाचा मृतदेह ताब्यात घेतला आणि शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. तसंच, आरोपी आई-वडिलांना ताब्यात घेत त्यांच्यावर गुन्हा दाखल केला.