Chain Snatcher Jija Sali : देशभरात गुन्ह्यांचं प्रमाण वाढत आहे. दररोज कुठे ना कुठेतरी चोरी, हत्या, बलात्कारसारख्या घटना आपल्या कानावर येत असतात. अशातच एक घटना समोर आली आहे. पोलिसांनी एका चेन स्नेचिंग टोळीचा पर्दाफश केला आहे. या प्रकरणात पोलिसांनी एका महिलेसह दोघांना अटक केली आहे. या टोळीच्या कारनाम्यांचं सीसीटीव्ही फुटेजही पोलिसांच्या हाती लागलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काय आहे नेमकी घटना?
लखनऊ पोलिसांनी नुकतीच एका टोळीला अटक केली. त्यांचे कारनामे ऐकून पोलिसही हैराण झाले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जीजा आणि मेहुणी मिळून गुन्हे करत होते. आरोपी मोहम्मद आसिफ बाईक चालवायचा तर मागे बसलेली त्याची मेहुणी राधा चालत्या बाईकवरुन महिलांच्या गळ्यातील सोन्याची चैन आणि मंगळसूत्र ओढायची. साखळी चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने पोलिसांनी तपास सुरु केला. 


पोलिसांनी ज्या ज्या ठिकाणी अशा घटना घडल्या आहेत. त्या ठिकाणचं सीसीटीव्ही फुटेज तपासलं. यात त्यांना बाईकवरुन एक पुरुष आणि एक महिला साखळी चोरताना दिसले. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी सापळा रचत दोघांनाही अटक केली आहे. या दोघांनी 8 ते 10 अशा प्रकारचे गुन्हे केल्याची कबुली दिली आहे.



चोरलेलं सोनं ते वेगवेगळ्या ज्वेलर्सच्या दुकानात विकायचे. आपण अडचणीत असून पैशांची गरज असल्याचं सांगत ते सोन्याच्या बदल्यात पैसे घ्यायचे. आसिफ हा 2016 मध्ये जेलमधून फरार झाला होता. पोलीस त्याचा शोध घेत होते.