Horror Killing: काही राज्यांमध्ये अजूनही प्रेमला कुटुंबियांकडून विरोध आहे. समाज, प्रतिष्ठा आणि जातीच्या कचाट्यात अडकून अजून कुटुंबातील सदस्य प्रेमी युगुलांचा जीव घेतात. असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. उत्तर प्रदेशातील मेरठमध्ये ऑनर किलिंगचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अल्पवयीन मुलीच्या प्रेमप्रकरणातून वडिलांनी स्वत:च्या मुलीच्या हत्येची सुपारी दिली. (Crime news trending news meerut angry over love affair father gives betel nut to kill daughter three including father arrested in maratha)


फिल्मी स्टाईल हत्येचा कट 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अल्पवयीन मुलीवर रुग्णालयात उपचार सुरु होते. मुलीच्या प्रेमप्रकरणामुळे संतप्त वडिलांनी मुलीच्या हत्येचा कट रचला. त्यांनी एका वार्ड बॉयला मुलीच्या हत्येची सुपारी दिली. तो वार्ड बॉय डॉक्टरांचा पोशाखात रुग्णालयात आला. मग वार्ड बॉयने आयसीयूमध्ये असलेल्या मुलीला पोटॅशियम क्लोराइडचे इंजेक्शन दिलं आणि तो पळून गेला. तिची प्रकृती बिघडल्यामुळे रुग्णालयातील डॉक्टरांना तिची तपासणी केली. या तपासणीत सर्व घटनासमोर आली. रुग्णालयातील डॉक्टरांच्या सतर्कतेमुळे या अल्पवयीन मुलीचा जीव वाचला आहे. 


अकरावीत शिकणाऱ्या या मुलीचं जिम ऑपरेटरसोबत प्रेमसंबंध होते. एके दिवशी ती घराच्या गच्चीवर दोरीवरील कपडे काढण्यासाठी गेली असताना त्यावर माकडांनी हल्ला केला. या हल्ल्यात ती जखमी झाली होती. त्यामुळे तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होता. याचा संधीचा फायदा घेता वडिलांनी मुलीच्या हत्येचा कट रचला. 


रुग्णालयातील सीसीटीव्हीच्या आधारावर त्या कंपाउंडरला अटक करण्यात आली. त्यानंतर वडिलांनी मुलीला मारण्यासाठी एक लाखाची सुपारी दिल्याची कबुली त्याने दिली. पोलिसांनी आरोपी वडील, कंपाउंटर आणि स्टाफ नर्सला अटक केली आहे.