Delhi Crime News: देशाची राजधानी सध्या क्राईम कॅपिटल बनत आहे. दिल्लीत एक अत्यंत भयानक आणि अंगावर काटा आणणारी घटना घडली आहे. घरातून अचानक गायब झालेल्या दोन वर्षाच्या चिमुरडीचा मृतदेह शेजाऱ्याच्या लॅपटॉपच्या बॅगेत सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. ही लॅपटॉप बॅग घराच्या खुंटीला लटकवण्यात आली होती. या घटनेमुळे दिल्ली पुन्हा एकदा हादरली आहे (Crime News). 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दिल्लीतील ग्रेटर नोएडा जवळील देवला गावात हा धक्कादायक प्रकार घडला आहे. एका दोन वर्षीय चिमुरडीची हत्या झाली आहे. यानंतर तिचा मृतदेह लॅपटॉपच्या बॅगेत भरुन ठेवण्यात आला होता. या घटनेमुळे मृत मुलीच्या आई वडिलांना मोठा धक्का बसला आहे. 


नेमक काय घडलं?


7 एप्रिल रोजी हा प्रकार घडला आहे.  मृत मुलीचे आई वडिल मुळचे चंदौली येथील आहेत. कामानिमित्ताने ते देवला येथे रहायला आले होते. मृत मुलीचे वडिल कामावर गेले होते. तिची आई तिला आणि तिच्या सात महिन्यांच्या लहान मुलीला घरात ठेवून मार्केटमध्ये गेली होती. मात्र, घरी आल्यावर तिला मोठा धक्का बसला. सात महिन्यांचे बाळ जोर जोरात रडत होते. तर, दोन वर्षाची मुलगी घरातून गायब होती. मृत मुलीचे आईने सर्वत्र शोधा शोध केली. मात्र, तिचा मुलगी कुठेच सापडली नाही.


असा सापडला मृतदेह


आजू बाजूला सर्वत्र आई आपल्या मुलीचा शोध घेत होती. मात्र, मुलगी कुठेच सापडली नाही. अखेरीस मुलीच्या वडिलांनी  पोलिस ठाण्यात मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. पोलिसांनी देखील तातडीने मुलीचा शोध सुरु केला. दरम्यान दोन दिवसांनी शेजारच्या बंद घातून उग्र वास येवू लागला. यामुळे शेजाऱ्यांनी पोलिसांना बोलावले. दरवाजा उघडताच पोलिसांना देखील धक्का बसला. घराच्या भिंतीवर खुंटीला एक लॅपटॉप बॅग लटकवण्यात आली होती. यातून रक्त गळत होते. पोलिसांनी ही लॅपटॉप बॅग उघडली असता बेपत्ता मुलीचा मृतदेह आढळला. 


ज्याच्या घरात मृतदेह सापडला तोच घेत होता मुलीचा शोध


ज्याच्या घरात ही मृतदेह असलेला  लॅपटॉपच्या बॅग आढळली तो शेजारी देखील चिमुरडीच्या आईला तिचा शोध घेण्यासाठी मदत करत होता. मात्र, त्याच्या घरातून दुर्गंधी येवू लागल्यानंतर तो घराला कुलूप लावून फरार झाला. यामुळे शेजाऱ्यानेच या मुलीची हत्या करुन व्हिलेवाट लावण्याच्या उद्देशाने तिचा मृतदेह बॅगेत भरुन ठेवला असावा असा प्राथमिक संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. तसेच आरोपीने मृत मुलीवर अत्याचार केल्याचीही शक्यता वर्तवली जात आहे. पोलिस या फरार शेजाऱ्याचा शोधल घेत आहे.