Delhi Metro News : बिकीनी गर्लने ( Bikini Girl) मेट्रोमधून प्रवास केल्यानंतर मेट्रोमधील अनेक व्हिडीओ व्हायरल झाले. खरं तर त्या तरुणीनंतर #DelhiMetro हा हॅशटॅग ट्रेंडमध्ये आला. मग मेट्रोमध्ये किस करणारा कपलचा व्हिडीओ (Couple videos), जागेवरून भांडणाऱ्या महिलेचा व्हिडीओ, आंघोळ करणाऱ्या तरुणाचा व्हिडीओ एक ना दोन नाही असे अनेक व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल झाले. मात्र दिल्ली मेट्रोमधील हा व्हिडीओ पाहून संतापाची लाट पसरली आहे. (Crime news in marathi)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती दिल्ली मेट्रोमधील लिफ्टमध्ये महिलेशी घाणेरडे आणि अश्लील कृत्य करताना कॅमेऱ्यात कैद झाला आहे. हा व्यक्ती महिलेला चुकीच्या जागी स्पर्श करताना दिसतं आहे. (Crime news viral video on Delhi Metro man touching private part of woman at lift trending video on social media )


त्या महिलेने सांगितलं की, ती लिफ्टमध्ये असताना तिथे एक पुरुष होता त्यांने महिलेच्या प्राव्हेट पार्टलाही स्पर्श केला. एवढंच नाही तर त्याने त्याचा प्रायव्हेट प्रार्टही दाखवला. महिलेने त्या नराधमाला विरोध केल्यावर तो तिथून पळून गेला. 



या घटनेबाबत महिलेने पोलिसांकडे तक्रार केली आहे. दरम्यान पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. IPC कलम 354A (लैंगिक छळ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजेश कुमार असं नराधमाचं नाव आहे. तो एका खाजगी रुग्णालयातील मेंटेनन्स विभागात कार्यरथ होता. ही धक्कादायक घटना दिल्लीतील जसोला अपोलो मेट्रो स्टेशनवरील आहे. 


महिलेने दिलेल्या माहितीच्या आधारे पोलीस त्याचा शोध करत होती. शुक्रवारी मिळालेल्या माहितीनुसार हा आरोपी जसोला अपोलो मेट्रो स्टेशनवर दिसून आला. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली. 


दरम्यान हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पण नैतिक जबाबदारी म्हणून हा व्हिडीओ न दाखविण्याचा निर्णय झी २४ तासने घेतला आहे. नेटकऱ्यांनी असे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करु नयेत.  काही दिवसांपूर्वी अशीच एक घटना मुंबईतील परळ रेल्वे स्टेशनवर घडली होती. या ठिकाणी एक व्यक्ती लोकलच्या लेडीज डब्यासमोर आपल्या प्राव्हेट पार्ट काढून उभा होता. अशावेळी तिथे असलेल्या एका तरुणीने मोठ्या धैर्याने आणि हिम्मतीने या घटनेचा व्हिडीओ काढला. त्यानंतर सोशल मीडियाच्या माध्यमातून सेंट्रल रेल्वेला टॅग करत या नराधमावर कारवाई करण्याची मागणी केली. 


पुरुषांच्या विकृत कृतीच्या अनेक घटना गेल्या काही वर्षांमध्ये आपण ऐकल्या आहेत. या मानसिकतेला आळा घालण्यासाठी कठोर पावल उचलली गेली पाहिजे, अशी मागणी मोठ्या प्रमाणात जोर धरत आहे.