Crime News : एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. कोल्ड्रिंक (Cold Drink) पिताच एका तरुणाला उलट्या झाल्या आणि काही वेळातच तो बेशुद्ध पडला. तातडीने त्या तरुणाला रुग्णालयात (Hospital0 दाखल करण्यात आलं. कोल्ड्रिंकमध्ये मासाचे काही तुकडे आढळल्याचं त्याच्या मित्रांनी सांगितलं. याप्रकरणी कोर्टाच्या (Court) आदेशावरुन कोल्ड्रिंक कंपनीविरुद्ध FIR दाखल करण्यात आली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काय आहे नेमकं प्रकरण
उत्तर प्रदेशमधल्या (Uttar Pradesh) बांदा इथलं हे प्रकरण आहे. काही मित्र इथल्या मर्दन नाका परिसरात फिरायला गेले होते. यात मनीष कश्यप नावाचा तरुणही होता. फिरत असताना या तरुणांनी कोल्ड्रिंकच्या पाच बाटल्या विकत घेतल्या. त्यानंतर कोल्ड्रिंक पित हे तरुण फिरत असतानाच मनीष अचानक उलटी करु लागला. काही क्षणातच तो जागीच बेशुद्ध पडला. अचानक घडलेल्या या घटनेने मनीषचे मित्रही घाबरले. यावेळी काही मित्रांनी मनीश ज्या कोल्ड्रिंकची बाटली तपासली असता त्यात पालीचे तुकडे आढळले.


कंपनीच्या हेल्पलाईन नंबरवर केली तक्रार
घटनेच्या काही वेळानंतर त्या कोल्ड्रिंक कंपनीच्या हेल्पलाईन नंबरवर (Help Line Number) फोन करत तक्रार दाखल करण्यात आली. शिवाय फोटोही पाठवण्यात आला. पण कंपनीकजून कोणतंच उत्तर आलं नाही. त्यामुळे मनिष कश्यप आणि त्यांच्या मित्रांनी कोर्टात धावा घेतली. कोर्टाने या प्रकरणाची गंभीर दखल घेत कोल्ड्रिंक कंपनीच्या फैजाबाद कार्यालयाविरुद्ध तक्रार दाखल करण्याचे आदेश दिले.


कोल्ड्रिंकची बाटली तपासासाठी पाठवली
कोर्टाचे आदेशानंतर कोल्ड्रिंक कंपनीविरुद्ध FIR दाखल करण्यात आला आहे. रुग्णालयातील खर्चाबरोबरच मानसिक त्रासाला सामोरं जावं लागल्याचं मनिष कश्यपचं म्हणणं आहे. पोलीस याप्रकरणी तपास करत आहे. कोल्ड्रिंकची बाटलीही तपासासाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आली आहे. प्रयोगशाळेच्या अहवालानंतर योग्य कारवाई करण्यात येईल असं पोलिसांनी सांगितलं आहे.