COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पेंच : मध्यप्रदेशातल्या पेंच व्याघ्र प्रकल्पात लंगडी वाघीणीनं केलेल्या शिकारीचा एक व्हिडिओ सध्या समाज माध्यमांवर चांगलाच चर्चेत आहे. मध्य प्रदेशातल्या जिनेवाली तलाव परिसरातल्या लंगडी नावाच्या या वाघिणीनं एका हरणाची शिकार केल्याचा हा व्हिडिओ आहे. 


जिनेवाली तलाव परिसरात लंगडी वाघीण झाडाच्या सावलीत आराम करत असताना, हरणांचा कळप त्या परिसरात आला. त्याची चाहुल लागताच लंगडी झुडपांमागे लपली. त्यानंतर सावज टप्प्यात येताच लंगडी वाघिणीने झेप घेत काही सेकंदांतच हरणाची शिकार केली. 


लंगडीने केलेली ही शिकार पाहून पर्यटकही थक्क झाले. आपल्या आईसोबत अशाच प्रकारे शिकार करताना पाय जखमी झाल्यानं या वाघीणीला  लंगडी हे नाव पडलं आहे.