नवी दिल्ली : काँग्रेसला चार वर्षांपूर्वी आम्हाला पराभूत करण्याची संधी मिळाली होती. पण, वारंवार जनताच त्यांना नाकारत आहे. काँग्रेसने देशावर चार वर्ष राज्य केलं. मात्र, जनतेनं आता त्यांना १०० वर्ष सत्तेपासून दूर ठेवायचं ठरवलंय, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर केलीय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

संसदेत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांवर शेरोशायरीच्या माध्यमातून तुफान फटकेबाजी केली. इतकी वर्ष सत्तेत राहूनही जनता आता तुम्हाला नाकारत आहे यावर ते विश्वास ठेवायला तयार नाहीत. लोकांना तुमची नियत कळली आहे. सतत पराभव होऊनही यांचा अहंकार संपत नाही.


'वो जब दिन को रात कहे, तो तुरंत मान जाओ'
'नही मानोगे, तो वो दिन में नकाब ओढ लेंगे'
'जरुरत हुई तो, हकीकत को थोडा बहोत मरोड लेंगे'
'वो मगरुर है, खुद की समज पर बेइंतहा'
'इन्हे आयना मत दिखाओ, वो आयने को भी तोड देंगे'
अशी शायरी म्हणत त्यांनी काँगेसवर हल्लाबोल केला.
    
नागालँडच्या लोकांनी १९८८ मध्ये काँग्रेसला मत दिलं होतं. २४ वर्ष झाली. ओडिसाने १९९५ मत दिलं. त्याला २७ वर्ष झाली. गोव्यात १९९४ मध्ये पूर्ण बहुमत मिळालं होतं. त्यानंतर गोव्यानेही नाकारलं. यूपी, बिहार आणि गुजरातमध्ये ३७ वर्षापूर्वी मतदान केलं होतं. पश्चिम बंगालमध्ये ५० वर्षापूर्वी, तामिळनाडूत ६० वर्षापूर्वी संधी दिली. 


काँग्रेस तेलंगना बनविण्याचं श्रेय घेते. पण तिथेही तुम्हाला नाकारलं. सगळीकडे नाकारलं जात आहे. तरीही तुमचा अहंकार काही संपत नाही. ना त्यांची सिस्टिम सुधारत आहे, असा टोला मोदी यांनी लगावला.


काँग्रेसनं मर्यादेचं पालन केलं असतं. या सदनाचा उपयोग चांगल्या कामासाठी केला असता. ही पवित्र जागा तुम्ही राजकारणासाठी वापरली. तर तुम्हाला जनतेनं नाकारलं नसतं, असं ते म्हणाले.