मुंबई : कधी कधी अति आत्मविश्वासही घातक ठरतो त्याचं उत्तम उदाहरण दाखवणारा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्ही मगरीशी पंगा घेण्याचा विचारही कधी करणार नाही. विशालकाय मगरीशी पंगा घेणं कार चालकाला चांगलंच महागात पडलं. या मगरीनं असा इंगा दाखवला की कार चालकही हैराण झाला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोशल मीडियावर मगर आणि कारचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओची चर्चा होण्यामागचं कारण म्हणजे मगरीनं जे केलं ते आहे. या व्हिडीओमध्ये पाहू शकता कार चालक मगरीच्या अंगावर कार घेऊन जात आहे.


सुरुवातीचे काही पावलं मगर मागे जाते. मात्र कार चालक काही केल्या मागे हटायला तयार नाही हे पाहिल्यावर ती त्याच्या गाडीवर हल्ला करते. तिची पकड एवढी जबरदस्त होती की गाडीचा पुढचा भाग निघून मगरीच्या जबड्यात जातो. मगर गाडीची पूर्णपणे वाट लावून टाकते. 


यावरून मगरीचा जबडा आणि दात किती मजबूत असतील याचा अंदाज लावू शकतो. मगरीचा हा रौद्रावतार पाहून कार चालकालाही धक्का बसतो. हा व्हिडीओ  Vicious Videos नावाच्या एका ट्वीटर युजरने शेअर केला आहे. 



अवघ्या 15 सेकंदाचा हा व्हिडीओ 18 हजारहून अधिक लोकांनी पाहिला आहे. यावर युजर्स वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. हा व्हिडीओ कुठला आहे याची माहिती मिळू शकली नाही. सोशल मीडियावर या व्हिडीओची सध्या खूप चर्चा होत आहे.