दिल्ली :  एप्रिल आणि मे महिन्यांत देशात कोरोना विषाणूच्या संसर्गाची आकडेवारी वाढतच चालली आहे. ज्यामुळे हा कोरोनाचा नवा स्ट्रेन किती धोकादायक आहे याची सत्याता समोर आली आहे. कोरोनाच्या विषाणूने जगात हाहाकार माजवल्यापासून सर्वत्र बऱ्याच प्रकारचे या विषाणूवर संशोधन आणि अभ्यास सुरू आहे. यामध्ये कोणत्या लोकांना संसर्गाचा धोका जास्त आहे, यावर संशोधन केले गेले आहे. काउंसिल ऑफ साइंटिफिक एंड इंटस्ट्रियल रिसर्च (CSIR) ने दावा केला आहे की, AB  आणि B रक्तगटातील लोकं बाकीच्या रक्तगटांतील लोकांपेक्षा कोरोनामुळे लवकर प्रभावित होतात.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या सर्वेक्षणात असे दिसून आले आहे की, कोरोनाची लागण झालेले जास्तीत जास्त लोकांचे रक्तगट AB आहेत. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर B रक्तगट असलेल्या लोकांना कोरोना संक्रमणाची लागण होते.


हाय फायबर वाला आहार एंटी-इन्फ्लेमेटरी असतो, तो शरीरावर इंफेक्‍शनपासून होणाऱ्या हल्लापासून प्रतिबंधित करतो. जरी व्हेज जेवण खाणऱ्या लोकांना संसर्ग झाला तरी रुग्णाची प्रकृती गंभीर होत नाही.


CSIR च्या या सर्वेक्षणांबद्दल वरिष्ठ चिकित्सक डॉ. एसके कालरा म्हणतात, "AB आणि B रक्तगटातील लोकं बाकीच्या रक्तगटांतील लोकांपेक्षा कोरोनामुळे लवकर प्रभावीत होता हे जरी खरं असले तरी, बल्ड ग्रुपवरील हा सर्वे केवळ एक नमुना आहे. साइंटिफिक रिसर्च पेपरवर याचा कोणताही रिव्यू झालेला नाही. त्यामुळे मग या रिसर्च पेपर शिवाय कमी लोकांमध्ये सर्वे करुन वेगवेगळ्या रक्त गटांमधील लोकांमध्ये संक्रमणाचे प्रमाण निश्चित केले जाऊ शकत नाही.


O रक्तगटाच्या लोकांमध्ये संक्रमणासाठी प्रतिकारशक्ती चांगली असते, हे आपण इतक्या लवकर सांगु शकत नाही. यासाठी मोठ्या प्रमाणात सर्वे करणे आवश्यक आहे."


नद्यांमध्ये मिळेले मृतदेह


देशात कोरोनाच्या दुसर्‍या लाटेमुळे परिस्थिती अतिशय वाईट झाली आहे. एकीकडे रुग्णालयात रुग्णांना जागा नाही. तर दुसरीकडे ऑक्सिजन आणि कोविड लसींचाही आभाव आहे. दिवस-रात्र लोकांच्या चिता जळत आहेत. तरीही डझनभर मृतदेह नद्यांमध्ये मिळत आहेत. यूपी आणि बिहारमध्ये अशी अनेक प्रकरणे नोंदवली गेली आहेत.


डब्‍ल्‍यूएचओकडून चिंता व्यक्त


कोविडमुळे झालेल्या मृतांच्या आणि त्यांच्या अंत्यसंस्कारासोबत निगडीत असलेल्या बातम्यांमुळे, डब्ल्यूएचओने भारतातील मृत्यू संख्येबद्दल चिंता व्यक्त केली आहे. तसेच डब्‍ल्‍यूएचओचे मुख्य वैज्ञानिक डॉ. सौम्या स्वामीनाथन यांनी म्हटले आहे की, सरकारने कोविड -19 ची खरी आकडेवारी समोर ठेवावी.


सध्या देशातील कोविड रिकवरी रेट पाहाता ही संख्या दिलासा देणारी आहे. गेल्या 24 तासांत, सक्रिय केसेसची संख्या जवळपास 25 हजारांपर्यंत कमी झाली आहे.