नवी दिल्ली : देशातच नव्हे तर संपूर्ण जगात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. दिवाळीनंतर कोरोना रुग्णांच्या संख्येत पुन्हा वाढ होताना दिसत आहे. शिवाय जानेवारी महिन्यात कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता देखील तज्ज्ञांनी वर्तवली आहे. ही साखळी तोडण्यासाठी राज्य आणि केंद्र युद्ध पातळीवार काम करत आहेत. कोरोनावर मात करण्यासाठी राजस्थानचे मुख्यमंत्री गेहलोत यांनी आढावा बैठक बोलावली. या आढावा बैठकीत त्यांनी जयपूर, जोधपूरमधील कोरोना स्थितीवर चिंता व्यक्त करत आधिकाऱ्यांना निर्देश देखील दिले आहेत .


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ते म्हणाले, कोरोनाची ही साखळी तोडणं अत्यंत गरजेचं आहे. अशात नागरिकांनी पाठिंबा दिला नाही तर दिवसा देखील कर्फ्यू लावण्यात येईल. नागरिक मास्क घालत नसतील, एकाच ठिकाणी गर्दी करत असतील किंवा सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करणार नसतील तर राज्यात दिवसा कर्फ्यू लावण्याची तंभी गेहलोत सरकारने नागरिकांना दिली आहे. 


याबरोबरच खोकला-सर्दी-तापाची संशयित लक्षणे असलेल्या लोकांची डोर-टू-डोर स्क्रीनिंग करण्याचे निर्देश मुख्यमंत्री गेहलोत यांनी दिले. अशा लोकांना आयसोलेशनमध्ये राहण्यास सांगितले आहे. शिवाय आरोग्य विभागातील लोकांना चाचण्या वाढवण्यास सांगितले आहे. ज्यामुळे कोरोना साखळी तोडण्यात मदत मिळेल असं देखील मुख्यमंत्री गेहलोत म्हणाले.