नवी दिल्ली : सोन्याच्या किंमती गेल्या दोन दिवसांपासून सतत चढताना दिसत आहेत... चांदीच्या किंमतीही चढ्या दिसून येत आहेत. अक्षय तृतीयानंतर (18 एप्रिल) जवळपास आठवड्याभरानंतर सोन्याच्या किंमती पुन्हा एकदा चढ्या आहेत. अक्षय तृतीयाच्या दिवशी सोन्याचा भाव 32,230 रुपये प्रति दहा ग्रामवर होता. परदेशात सोन्याची मागणी घटली असली तरी देशात मात्र लग्नसराईमुळे स्थानिक सोनारांकडे सोन्याच्या दागिन्यांची मागणी वाढताना दिसतेय. 


दोन दिवसांत हजार रुपयांनी किंमतीत वाढ


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोन्याच्या किंमतीत थोडीफार नाही तर दखल देण्याजोगी वाढ झालीय. केवळ दोन दिवसांत सोन्याच्या किंमतीत तब्बल 1070 रुपयांची वाढ झालीय.


23 एप्रिल रोजी दिल्लीत सोन्याच्या किंमती 31,280 रुपये प्रति दहा ग्रामवर होत्या. 24 एप्रिल रोजी हा आलेख चढता राहिला... आणि किंमती 32,075 रुपयांवर दाखल झाल्या. 


25 एप्रिल रोजी दिल्ली सराफा बाजारात बुधवारी सोन्याची किंमत पुन्हा 225 रुपयांनी वाढून 32,450 रुपये प्रति दहा ग्रामवर दाखल झाली. चांदीची किंमतही 200 रुपयांनी वाढ होऊन 40,000 रुपये प्रति किलोवर पोहचलीय.  


देशातील चार शहरांतील सोन्या - चांदीचे भाव


शहर   -  सोने   -   चांदी 
दिल्ली  - 32,300  -  40,700
मुंबई   -  31,325  -  39,475
कोलकाता  -  30,200  -  39,650
चेन्नई   -  29,980  -  43,100