मुंबई : सोशल मीडियावर सध्या एका बातमीची जोरदार चर्चा आहे. घटना ही तशीच आहे तर चर्चा तर होणारंच. कारण एक व्यक्ती चक्क 2 रुपये किलोचे धान्य घेण्यासाठी थेट महागडी मर्सिडिज कार घेऊन पोहोचला. रेशन दुकानासमोर त्यांने मर्सिडिज उभी करताच सगळेच त्याच्याकडे पाहत राहिले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पंजाबमधील स्वस्त रेशन योजनेतून मिळणारे धान्य घेण्यासाठी एक जण आला होता. पण यासाठी तो महागडी मर्सिडीज घेऊन आला. मर्सिडीज चालवणारा माणूस दुकानावर आला. त्याने ४० पोती शिधा खरेदी केले. नंतर मर्सिडीजच्या डीकीमध्ये त्याने पोती ठेवली आणि तिथून निघून गेला. या मर्सिडीजचा नंबरही व्हीआयपी होता.


एका स्थानिक व्यक्तीने ही घटना व्हिडिओमध्ये रेकॉर्ड केली. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सुमित सैनी असं धान्य घेऊन जाणाऱ्या व्यक्तीचं नाव आहे. त्याने सांगितले की, 'व्हिडीओमध्ये दिसणारी गाडी त्याच्या नातेवाईकाची आहे, नातेवाईक परदेशात आहे आणि गाडी सध्या त्याच्याकडे दिली आहे.  डिझेल कार असल्याने कधी कधी तो ती गाडी फिरवतो.'



'सुमित सैनी पुढे म्हणाला की, 'माझी मुलं रेशन दुकानावर उभी होती. सुमित सैनी म्हणाले की त्यांचा छोटासा व्यवसाय आहे, माझी मुलं सरकारी शाळेत शिकतात. कोणीतरी प्रँक व्हिडिओ बनवून तो व्हायरल केला आहे.'