सायबराबाद : आपण सोशल मीडियावर एकापेक्षा एक मनोरंजक व्हिडीओ पाहात असतो, जे आपलं मनोरंजन करतात, तर काही व्हिडीओ आपल्याला माहिती देखील देतात. परंतु सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला व्हिडीओ हा लोकांना नुसतं हसवतच नाही तर लोकंना एक संदेश देखील देत आहे. हा व्हिडीओ तुम्ही पाहिलात तर नक्कीच तुमचा मूड तर चेंज होईलच, पण त्याचबरोबर हा व्हिडीओतील दृष्य सारखे तुमच्या डोळ्यासमोर येऊन तुम्हाला हसू येईल.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हा व्हिडीओ तेलंगणाच्या सायबराबादमधील आहे. याला तेथील पोलिसांनी ट्विट केला आहे. हा व्हिडीओ खूप मजेदार आहे. जो एका टोल प्लाझाचा आहे. व्हिडीओला एक मनोरंजक कॅप्शन देत पोलिसांनी लिहिले की, "वेगवान वाहन चालविणे आणि लोकांना मालवाहतुकीतून नेणे हे नेहमीच धोकादायक असते."


टोल प्लाझामध्ये बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेर्‍यामध्ये हे दृष्य कैद झाले आहे. ज्याचा पोलिसांनी व्हिडीओ लोकांना जागरुक करण्यासाठी वापरला आहे.


व्हिडीओमध्ये नक्की काय आहे?


व्हायरल व्हिडीओमध्ये एक टोल प्लाझा दिसत आहे, जेथे सगळ्या गाड्या एका बॅरिअर समोर थांबून टोल भरुन मग पुढे जात आहेत. पहिला आलेला ट्रक ड्रायव्हर टोल भरतो आणि निघून जातो. त्यामागून एक टॅम्पो येतो, ज्याच्या टपावर माणसं बसलेली आहेत. या टॅम्पोचा चालक या टोलवर न थांबता वेगाने गाडी पळवण्याचा विचार करतो.


परंतु त्यावेळेला हा बॅरिअर बंद होतो. ज्यामुळे तो टॅम्पोवर बसलेल्या लोकांवर आदळतो. त्यामध्ये सेंसर असल्यामुळे तो पुन्हा वर होतो आणि बंद होण्यासाठी पुन्हा खाली येतो. ज्यामुळे तो वारंवार या वाहानवर बसलेल्या लोकांच्या डोक्यात आदळतो.


ही क्रिया तीन-चार वेळा होते आणि लोकांवर जोरदार हल्ला केला जातो. या व्हायरल व्हिडीओला पाहून लोकं खूप मजा घेत आहेत.



आतापर्यंत 33 हजारांपेक्षा अधिक लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे. तर 217 लोकांनी ट्विट केले आहे आणि जवळपास 2 हजार लोकांना हे आवडले आहे.


एका ट्विटर यूझरने कमेंट केलं आहे की, 'हे पाहून मजा आली, माझे शाळेचे दिवस आठवले.' त्याच वेळी दुसऱ्या एका यूझरने लिहिले की, 'बर्‍याचदा लोकं माल वाहतूक वाहनात प्रवासी घेऊन जातात जे धोकादायक ठरू शकते, हा व्हिडीओ त्याचे एक उदाहरण आहे.'