नवी दिल्ली : बंगालच्या उपसागरात निर्माण झालेलं अम्फान हे चक्रीवादळ आज बंगालचा उपसागर ओलांडून पश्चिम बंगाल आणि बांग्लादेशच्या किनाऱ्यावर धडकण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्तकतेच्या इशारा देण्यात आला आहे. संकटाचा सामना करण्यासाठी एनडीआर एफच्या ४१ तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. या चक्रीवादळाचे रौद्ररुप यामुळे दिघा, सुंदरबन, हतीया, या भागांवर मोठा परिणाम जाणविण्याची अधिक शक्यता आहे. यावेळी, ताशी १५५ ते १८५ किलोमीटर वेगाने वारे वाहतील, असे भारतीय हवामान विभागाने Indian Meteorological Department (IMD) म्हटले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या चक्रीवादळामुळे पश्चिम बंगालमध्ये, पश्चिम मिदनापूर, साऊथ आणि नॉर्थ २४ परगणा, हावडा, हुगळी आणि कोलकाता या जिल्ह्यांमध्ये, तर ओदिशात, जगतसिंगपूर, केंद्रपारा, भद्रक, जजपूर आणि बालासोर या जिल्ह्यांमध्ये मोठे नुकसान होण्याचा इशारा, भारतीय हवामान विभागाचे महासंचालक  मृत्युंजय मोहपात्रा यांनी दिला आहे. त्यामुळे या ठिकाणी मोठी सर्तकता घेण्यात येत आहे.  अम्फान या वादळाच्या रौदरुपाला तोंड देण्यासाठी एनडीआर एफच्या ४१ तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. काल केंद्रीय गृहमंत्रालयाने याबाबत निर्णय घेणार असल्याचे म्हटले होते.


चक्रीवादळाचा प्रभाव जाणवणाऱ्या भागात रेल्वे आणि रस्ते वाहतूक सुविधा तात्पुरती बंद ठेवण्यात येणार आहेत. महाराष्ट्र सरकारने २१ मेपर्यंत श्रमिक रेल्वे सेवा स्थगित केली आहे. पश्चिम बंगाल आणि ओडिशा या ठिकाणी मजुरांना घेऊन या श्रमिक रेल्वे जाणार होत्या. त्या आता रद्द करण्यात आल्या आहेत, असे महाराष्ट्र सरकारकडून कळविण्यात आले आहे. 


तसेच अम्फान  या चक्रीवादळाचा मोठा तडाखा बसण्याची शक्यता असून नागरिकांनी घराबाहेर पडू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच आसाम आणि सिक्कीमच्या पश्चिम भागात जोरदार पाऊस पडेल असा इशाराही  भारतीय हवामान विभागाने दिला आहे. दरम्यान, या चक्रीवादळाला तोंड देण्यासाठी, एनडीआरएफ म्हणजेच राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या ४१ तुकड्या, पश्चिम बंगाल आणि ओडिशात तैनात केल्या आहेत अशी माहिती, एनडीआरएफचे महासंचालक एस. एन. प्रधान यांनी दिली आहे.