Cyclone Fengal Live Location : (Kashmir Weather) काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत (Kanyakumari) देशभरात हवामानाचा वेगळाच अंदाज पाहायला मिळत असताना आता पुन्हा एकदा वाऱ्यांनी दिशा बदलल्याचं लक्षात येत आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागानं दिलेल्या इशाऱ्यानुसार 'फेंगल' हे चक्रीवादळ तीव्रता वाढल्यानंतर दक्षिण भारतामध्ये थैमान घालण्याची शक्यता आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तामिळनाडू (Tamilnadu) आणि नजीकच्या किनारपट्टी क्षेत्रामध्ये निर्माण होणाऱ्या या चक्रीवादळामुळं आयएमडीनं काही राज्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. इतकंच नव्हे तर, रेल्वे आणि विमानसेवांवरही या वादळाचा परिणाम होण्याची शक्यता असल्यामुळं त्यांच्या वेळापत्रकातही बदल केले जाण्याची शक्यता असल्याचा इशारा देण्यात आला आहे. 


IMD च्या निरीक्षणानुसार बंगालच्या दक्षिण पश्चिमी खाडी क्षेत्रामध्ये एक अधिक तीव्रतेचा कमी दाबाचा पट्टा मागील 9 तासांपासून साधारण 3 किमीप्रतितास इतक्या वेगानं सध्यातरी धीम्या गतीनं उत्तर- उत्तर पश्चिमेला पुढे सरकत आहे. पुढील काही तासांतच या कमी दाबाच्या पट्ट्याचे थेट परिणाम दिसण्यास सुरुवात होणार आहे. 30 नोव्हेंबरला सकाळच्याच वेळेत तामिळनाडूच्या उत्तर आणि पुद्दुचेरी या किनारपट्टी भागांवर हे वादळी वारे धडकतील. ज्यामुळं पुद्दुचेरीसह कराईकल आणि नजीकच्या भागांमध्ये जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 


या क्षेत्रातील सर्व सरकारी आणि खासगी शाळांसह महाविद्यालयांना गुरुवारी सुट्टी देण्यात आली असून, शुक्रवारचं वेळापत्रकही शालेय संस्था जारी करणार आहेत. बंगालच्या उपसागरात तयार होणाऱ्या या कमी दाब क्षेत्रामुळं किनारपट्टी भागांमध्ये सोसाट्याचा वारा सुटण्याची शक्यता असली तरीही महाराष्ट्रावर मात्र या प्रणालीचा थेट परिणाम होणार नाही, असं असलं तरीही किनारपट्टी भागांमध्ये मात्र यंत्रणा सतर्क असल्याचं पाहायला मिळत आहे. 


पाहा वादळाचं Live Location 



हेसुद्धा वाचा : Maharashtra Weather News : राज्यात थंडीच्या लाटेचा यलो अलर्ट; कुठे जाणवणार रक्त गोठवणारा गारठा? 


आयएमडीनं वर्तवलेल्या अंदाजनुसार उत्तर उत्तर पश्चिमेला हे वारे पुढे आल्यानंतर वादळाची तीव्रता आणखी वाढणार आहे. ज्यामुळं गुरुवारी सायंकाळनंतर वादळामुळं मोठ्या संकटाची चाहूल आताच मिळत आहे. तामिळनाडूनमध्ये सध्या यंत्रणा सतर्क असून, या भागात अतिवृष्टी किंवा तत्सम संकट ओढावल्यास आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या वतीनं एक मोठी यंत्रणासुद्धा तैनात ठेवण्यात आली आहे.