Rakesh Jhunjhunwala Trust : शेअर बाजारचे 'बिग बुल' म्हणून ओळख असलेले राकेश झुनझुनवाला (Rakesh jhunjhunwala) यांचं काही दिवसांपूर्वीच निधन झालं. पाच हजार रुपयांच्या गुंतवणूकीतून कोट्यावधी रुपयांची संपत्ती निर्माण केल्यामुळे राकेश झुनझुनवाला यांची सर्वसामान्य लोकांमध्ये लोकप्रियता वाढली. पण, त्यांच्या निधनानंतर मात्र या अमाप संपत्तीची देखरेख कोण करणार? त्यांचं कोट्यावधी रुपयांचं साम्राज्य कोण सांभाळणार? हाच प्रश्न उपस्थित होत होता, अखेर त्याचं उत्तर मिळालं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राकेश झुनझुनवाला यांचा मालकी हक्क असलेल्या ट्रस्टचे मुख्य ट्रस्टी म्हणून डी-मार्टचे संस्थापक राधाकिशन दमानी (Radhakishan damani) यांची निवड झाली आहे.


झुनझुनवाला हे राधाकिशन दमानींना विश्वासू मित्र आणि गुरु मानत होते. याव्यतिरिक्त त्यांच्या ट्रस्टींमध्ये कल्पराज धर्मशी आणि अमल पारिख यांचाही समावेश आहे.


राकेश झुनझुनवाला यांच्या 'रेअर एंटरप्रायजेस' (RARE Enterprises) या फर्मचं व्यवस्थापन, त्यांचे दोन विश्वासू सहकारी उत्पल सेठ आणि अमित गोयल यांच्याच हाती राहणार आहे.