7th Pay Commission DA Hike Updates : केंद्र सरकार आपल्या कर्मचाऱ्यांसाठी चांगली बातमी देण्याच्या तयारीत आहे. (7th Pay Commission ) सरकार लवकरच कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्त्यात (DA Hike) वाढ करण्याची घोषणा करु शकते. त्याबाबत हालचाली सुरु झाल्या आहेत. महागाई भत्त्याबाबत मंत्रिमंडळात मंजुरी मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. (DA Hike Updates  News in Marathi) ही मंजुरी मिळाल्यानंतर पंतप्रधान मोदी त्यावर शिक्कामोर्तब करतील आणि याची ते घोषणा करु शकतात. ((DA Hike  News in Marathi )


महागाई भत्त्याबाबत कोणताही निर्णय झाला नाही, पण..


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

केंद्र सरकारच्या अंतर्गत म्हणजेच केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ होण्याची शक्यता आहे. कर्मचाऱ्यांची प्रतीक्षा लवकरच संपुष्टात येईल. बुधवारी मंत्रिमंडळात महागाई भत्त्याबाबत कोणताही निर्णय झाला नाही. पण, मीडिया रिपोर्टच्या माहितीनुसार पंतप्रधान मोदी यावर निर्णय घेणार आहेत.


महागाई भत्ता 42 टक्के होण्याची शक्यता 


मोदी येत्या बुधवारी महागाई भत्त्याची घोषणा करु शकतात. 1 मार्च रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत एक करार झाला आहे. पण, मंत्रिमंडळानंतर त्याची घोषणा झालेली नाही. 15 मार्च रोजी होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर केंद्रातील मोदी सरकारकडून डीएची घोषणा केली जाऊ शकते. हा महागाई भत्ता 42 टक्के होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांचा पगार चांगला वाढणार आहे.


वाढीव महागाई भत्ता जानेवारी 2023 साठी दिला जाणार ?


CPI-IW डेटाच्या आधारे, महागाई भत्त्यात वाढ झाली आहे. वाढीव महागाई भत्ता जानेवारी 2023 साठी दिला जाणार आहे. जानेवारी ते जून या कालावधीसाठी डीए जाहीर होऊ शकतो. याची अमलबजावणी जानेवारी 2023  पासूनच लागू होईल असे म्हटले जात आहे. सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना 38 टक्के दराने महागाई भत्ता दिला जात आहे. आता मार्चच्या पगारापासून 42 टक्के महागाई भत्ता देण्यात येणार असल्याचे बोलले जात आहे.


निवृत्त वेतनधारक कर्मचाऱ्यांना मिळणार लाभ?


दरम्यान, याचा लाभ निवृत्त वेतनधारक कर्मचाऱ्यांना मिळेल, अशी शक्यता आहे. पंतप्रधा मोदी केवळ केंद्रीय कर्मचाऱ्यांनाच नव्हे तर देशातील लाखो पेन्शनधारकांनाही वाढीव महागाई भत्त्याचा लाभ देणार आहेत. महागाई भत्ता (DA) सोबत, महागाई मदत (DR Hike) देखील 4 टक्क्यांने वाढली आहे. अर्थात निवृत्तीवेतनधारकांना केंद्र सरकारकडून 42 टक्के दराने महागाई सवलत मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे वाढत्या महागाईत नोकदार वर्गाला आणि निवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.