मुंबई : सोशल मीडियावर आपल्यासमोर असे काही व्हिडीओ येत असतात, जे पाहून आपले मनोरंजन होतं, तर काही व्हिडीओ हे आपल्याला आश्चर्यचकीत करणारे असतात. सोशल मीडिया हे एक असं जग आहे. जेथून आपल्याला बऱ्याच गोष्टी शिकायला देखील मिळतात. असाच एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. जो वेळेचं महत्व आपल्याला जाणून घेण्यासाठी मदत करत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वेळ ही आपल्या आयुष्यातील महत्वाची गोष्ट आहे. कारण ती जर एकदा आपल्या आयुष्यातून निघून गेली, तर ती पुन्हा येत नाही. तसेच वेळ ही आपल्याला बरंच काही शिकवून जाते.


एखाद्याच्या आयुष्यात एक सेकंद देखील किती महत्वाचा असतो, हे सांगणारा व्हिडीओ पाहा.



या व्हिडीओमध्ये एक महिलेचे प्राण एका सेकंदाने वाचले आहेत. हा व्हिडीओ अंगावर काटा आणणारा आहे. परंतु यामुळे तुम्हाला वेळ किती महत्वाची असते हे लक्षात येईल.


हा व्हिडीओ उत्तर प्रदेशातील ललितपूर रेल्वे स्टेशनवरील असल्याचे समोर आले आहे. यामध्ये एक महिला रेल्वे रुळ क्रॉस करत असते. त्यावेळेला तेथून ट्रेन येते परंतु या महिलेच्या ते लक्षात येत नाही.


व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, त्यादरम्यान RPF जवान स्टेशनवर उभा राहून त्या महिलेला पुढे येऊ नकोस असे सांगतो. परंतु त्या महिलेच्या काही लक्षात येत नाही आणि ती पुढे येते.


हा सगळा प्रसंग घडेपर्यंत ट्रेन खूपच जवळ आली होती. तेव्हा RPF जवान पुढे धावतो आणि या महिलेला वर खेचतो. ज्यामुळे तिचे प्राण वाचतात.


हा व्हिडीओ ANI ने ट्वीटरवरती शेअर केला आहे. जो सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.