दार्जिलिंग: दार्जिलिंगमध्ये गोरखा जनमुक्ती मोर्चाच्या आंदोलनामुळे परसलेला तणाव अद्याप कायम आहे. आज सलग दुसऱ्या दिवशी या हिलस्टेशनमध्ये इंटरनेट सेवा बंद ठेवण्यात आली आहे. स्वतंत्र गोरखालँडच्या मागणीसाठी शहरात अनेक मोर्चे निघाले. या मोर्चांमध्ये पश्चिम बंगाल सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा पुतळा जाळण्यात आला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या आंदोलनामध्ये तीन आंदोलक मारले गेल्याचा आरोप सरकारवर करण्यात येत आहे. दरम्यान, GJMच्या नेत्यांनी सोशल मीडियाचा वापर करून आंदोलन भडकवू नयेत यासाठी पोलिसांनी शहरातली इंटरनेट सेवा कालपासून बंद केलीये. सुरक्षा दलांनी शहरामध्ये संचलन करत नागरिकांना शांतता राखण्याचं आवाहन केलं.