मुंबई : दारूल अलूम देवबंद या संस्थेने एक वेगळाच फतवा जाहीर केला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

देशातील प्रमुख इस्लामी शिक्षण संस्था म्हणून दारूल अलून देवबंदकडे पाहिले जाते. या संस्थेने एक वेगळाच फतवा जाहीर केला आहे. बँकेत नोकरी करण्याऱ्या लोकांशी कुणीही विवाह करायचा नाही असा अनोखाच फतवा जाहीर केला आहे. या कुटुंबाशी कोणताही संबंध जोडायचा नाही असं त्यांनी सांगितलं आहे. एवढंच नाही तर शरीराला जाकणारा पण अगदी तंग असलेल्या बुरका घालण्यासही या संस्थेने विरोध केला आहे. 


दारूल उलूम फतवा विभागातील दारूल इफ्ता यांनी बँकेत नोकरी करणाऱ्या व्यक्तीच्या घरात कुणाशी ही लग्न करण्याचा विरोध केला आहे. इस्लामी नुक्ते सांगत त्यांनी 3 जानेवारीला हा नवा फतवा जाहिर केला आहे. 


नेमकं काय झालं? 


एका व्यक्तीने विचारलं की, त्याच्या लग्नासाठी एका घरातून स्थळ आलं होतं. त्या घरातील मुलीचे वडिल हे बँकेत कामाला होते. आणि बँकेतील सर्व तंत्र हे संपूर्णपणे व्याजावर चालते. आणि व्याजाचा पैसा हा इस्लाममध्ये हराम मानला जातो. त्यामुळे अशा घराशी कोणताही संबंध ठेवायचा नाही असं त्यांनी सांगितलं आहे. 


फतव्यात काय सांगितलंय


अशा घराशी लग्नाला संपूर्णपणे विरोध केला जातो. हरामाच्या पैशाने लहानाचे मोठे झालेल्या मुलांवर चुकीचे संस्कार होतात. एवढंच नाही तर ते म्हणाले की अशा घराशी कोणताच संबंध ठेवला नाही पाहिजे. संबंध जोडताना पवित्र कुटुंबाशी नातं जोडलं गेलं पाहिजे.