आता, महिला टीव्ही अँकर्ससाठीही `देवबंद`चा फतवा
`महिलांना केस मोकळे सोडण्याची परवानगीही इस्लाम देत नाही`
नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील एक शिक्षण संस्था असलेल्या दारुल उलूम देवबंदनं आता पुन्हा एक नवीन फतवा जारी केलाय. हा नवीन फतवा आहे टीव्हीमध्ये दिसणाऱ्या स्त्रियांसाठी... न्यूज चॅनल्सवर बातम्या वाचताना दिसणाऱ्या महिला अँकर्ससाठी हा फतवा आहे. महिला टीव्ही अँकर्सनं अँकरिंग दरम्यान स्कार्फ गुंडाळणं गरजेचं आहे, अशा सूचना या फतव्यात देण्यात आल्यात. महिलांना केस मोकळे सोडण्याची परवानगीही इस्लाम देत नाही, असंही या फतव्यात म्हटलं गेलंय.
अधिक वाचा :- स्त्रिया-पुरुषांनी एकत्र जेवणं गैर-इस्लामिक, देवबंदचा फतवा
उल्लेखनीय म्हणजे, 'दारुल उलूम देवबंद' ही मुस्लीम महिलांच्या शिक्षणासाठी जगविख्यात असलेली संस्ता आहे. या संस्थेकडून गेल्या काही दिवसांत फतव्यांवर फतवे जारी केले जात आहेत. देवबंदच्या मुफ्ती अहमद यांच्यानुसार, 'रिपोर्टिंग किंवा अँकरिंग करणाऱ्या मुस्लीम महिलांनी चेहऱ्याभोवती स्कार्फ गुंडाळूनच काम करायला हवं... त्यामुळे त्यांचे मोकळे केस दिसणार नाहीत... बुरखा वापरला तर चांगलंच...' असं त्यांनी म्हटलंय.
शरीयतनं सर्व महिला आणि पुरुषांना अर्थाजनाचं स्वातंत्र्य दिलंय... आपल्या घराच्या गरजा पूर्ण करण्यासाठी ते कोणतंही काम करू शकतात. त्यात कुणालाही आक्षेप नाही... परंतु, शरीयतमध्ये टीव्हीवर दिसणाऱ्या महिलांनी कसं काम करावं हेदेखील सांगण्यात आलंय, असं दारुल उलूम देवबंदच्या फतव्यात म्हटलं गेलंय.
अधिक वाचा :- निदाविरोधात फतवा देणाऱ्यांची संपत्ती जप्त करा, अल्पसंख्यांक आयोगाचे आदेश
बुरख्याचा वापर हा शरीर झाकण्याचा सर्वात चांगला उपाय आहे. त्यामुळे संपूर्ण शरीर झाकलेलं असतं... दुसरा उपाय म्हणजे तुम्ही चेहऱ्याभोवती स्कार्फ गुंडाळू शकता... त्यामुळे तुमचे केस लोकांना दिसणार नाहीत... आणि तुम्ही तुमचं अँकरिंग करू शकता... मुलाखती घेऊ शकता... तुम्हाला हवं ते काम करू शकता... असंही यात म्हटलं गेलंय.
अधिक वाचा :- बँकेत नोकरी करणाऱ्यांच्या घराशी कोणताही संबंध जोडू नका
यापूर्वी जारी करण्यात आलेल्या फतव्यात, कोणत्याही कार्यक्रमात अथवा समारंभाग सामूहिकरित्या सहभागी झालेल्या स्त्रिया आणि पुरुषांनी एकत्र उभं राहून भोजन करणं केवळ 'नाजायज' (अनुचित) नाही तर गुन्हा असल्याचं आलं होतं.