स्त्रिया-पुरुषांनी एकत्र जेवणं गैर-इस्लामिक, देवबंदचा फतवा

'पुरुष - स्त्रियांनी एकत्र जेवणं केवळ 'नाजायज' (अनुचित) नाही तर गुन्हा आहे'

Updated: Dec 20, 2018, 09:46 AM IST
स्त्रिया-पुरुषांनी एकत्र जेवणं गैर-इस्लामिक, देवबंदचा फतवा

सहारनपूर : इस्लामिक शिक्षण संस्था दारुल उलूम देवबंद पुन्हा एकदा आपल्या आगळ्या-वेगळ्या फतव्यामुळे चर्चेत आहे. यावेळी दारुल उलूम देवबंदनं जारी केलेल्या फतव्यानुसार, कोणत्याही कार्यक्रमात अथवा समारंभाग सामूहिकरित्या सहभागी झालेल्या स्त्रिया आणि पुरुषांनी एकत्र उभं राहून भोजन करणं गैर-इस्लामिक आहे. याशिवाय आणखी एका फतव्यात मोबाईल फोनवर परवानगीशिवाय एकमेकांचे कॉल रेकॉर्ड करणं हा विश्वासघात आणि 'गुन्हा' असल्याचंही म्हटलं गेलंय. 

संस्थेच्या फतवा विभागातील मुफ्ती-ए-करामला एका व्यक्तीनं यासंबंधी प्रश्न विचारला होता. फोन कॉल सहजच रेकॉर्ड केले जातात... अनेक फोनमध्ये ऑटो कॉल रेकॉर्डिंगची व्यवस्था असते. यावेळी, समोरच्या व्यक्तीला आपला आवाज रेकॉर्ड होतोय याची साधी कल्पनाही नसते... परंतु, हे गैर-इस्लामिक असून ते योग्य नसल्याचं देवबंदनं म्हटलंय. 
 
दुसऱ्या एका फतव्यात, सामूहिक रुपात पुरुष आणि स्त्रियांनी कोणत्याही कार्यक्रमात सहभागी होत एकत्र जेवणं केवळ 'नाजायज' (अनुचित) नाही तर गुन्हा असल्याचं इफता विभागाडून सांगण्यात आलंय.