Shocking Video : संतापजनक! ...म्हणून सुनेकडून सासूला बेदम मारहाण; सासऱ्यांनाही मारली लाथ
Viral Video : उत्तर प्रदेशातील बिजनौरमध्ये सूनेने सासूरला मारतानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अजून एक सुनेची सासूला बेदम हाणामारी करतानाचा धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. (Crime News)
Woman Attacks Mother in Law Video : सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडीओ (Shocking Video) व्हायरल झाला आहे. यामध्ये एका घरात एक महिला वृद्ध महिलेला मारहाण करताना दिसत आहे. मारहाण करणारी महिला ही त्या वृद्ध महिलेची सून होती. घरगुती वादातून भांडण होणे हे सामान्य बाब आहे. पण अशा प्रकारे मारहाणी करणे हे आक्षेपार्ह आहे. (Crime News)
सासू सूनेचं भांडण हे काय नवीन नाही. पण सूनेकडून वृद्ध सासूला अशाप्रकारे मारहाण करताचा हा धक्कादायक व्हिडीओ संतापजनक आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ वाऱ्यासारखा पसरला आहे.(daughter in law Mother in Law Video)
संतापजनक व्हिडीओ (Shocking Video)
सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडीओ गुजरातमधील सुरत शहरातील आहे. वृद्ध महिला घरातील सोफ्यावर बसली असताना सूने आक्रमक होत सासूच्या अंगावर धावून जाते. केस ओढत सून सासूच्या गालाला चावल्याचा या व्हिडीओमध्ये दिसतंय. (daughter in law attacks old mother in law beaten badly video viral on Internet Gujarat Surat Trending news)
धक्कादायक म्हणजे त्या महिलेचे सासरे हे भांडण सोडवण्यासाठी जातात पण ती महिलेला त्यांचा वयाचा विचार न करता त्यांनाही लाथ मारते. संतापजनक म्हणजे ही महिला आपल्या दोन लहान मुलींसमोर सासूला आक्षेपार्ह पद्धतीने मारहाण करताना दिसत आहे.
निर्दयी सून !
सासू सासरे, सून आणि दोन मुलींसह अजून एक व्यक्ती घरात असल्याचं वाटतं. कारण याच व्यक्तीने या घटनेचा व्हिडीओ बनवला आहे. कदाचित व्हिडीओ बनवणारा व्यक्ती हा त्या महिलेचा नवरा असू शकतो.
मिळालेल्या माहितीनुसार मालमत्तेच्या वादातून शाब्दिक बाचाबाची नंतर सासू सूनेमध्ये हिंसक मारहाण झाली. हा व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्वीटरवर Deepika Narayan Bhardwaj या महिलेच्या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. 40 सेकंदच्या या व्हिडीओने यूजर्सची झोप उडवली आहे.
दरम्यान काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशातील बिजनौरमध्येही सूनेला सासूला मारहाण करतानाचा व्हिडीओ समोर आला होता. सून सासूला मारहाण करताना घरातील सीसीटीव्हीमध्ये कैद झालं होतं. पोलिसांनी याप्रकरणी सूनेविरुद्ध गुन्हा नोंदवला असून तपास सुरु आहे.