Viral Video : सोशल मीडियाच्या जगात कुठली गोष्ट व्हायरल होईल किंवा ट्रेंडमध्ये येईल याचा काही नेम नाही. सध्या सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडीओ व्हायरल होतो आहे. ज्यामुळे सूनेचं विवाहबाह्य प्रकरण सासूने उघड केलंय. रात्रीच्या अंधारात सूनेचे हे कृत्य पाहून सासूसह घरातील सर्वांना धक्का बसला आहे. सूनचे हे कृत्य घरातील सदस्यांना मोबाईलमध्ये रेकॉर्डिंग केलं. त्यानंतर या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. 


नेमकं काय घडलं?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मीडिया रिपोर्ट्सनुसार, नवरा बाहेर गावी आहे हे पाहून सूनेने घरातील इतर सदस्य झोपल्यावर प्रियकराला खोलीत भेटण्यासाठी बोलवलं. मध्यरात्री सासूच्या कानावर आवाज ऐकू आलेत. मुलगा घरी नाही तर सूनेच्या खोलीतून कसला आवाज येतो, यामुळे तिच्या मनात संशय आला. तिने घरातील इतर सदस्यांना घेऊन सूनेच्या खोलीवर धाबा टाकला. सूनेने खोलीचा दरवाजा उघडल्यास खोलीत कोणी दिसलं नाही. पण सासूला शंका होती तिने खोलीची झाडाझडती घेतली. पलंगाखाली, कपट उघड तिथे कोणी लपवून बसलंय की हे पाहिलं. पण त्यांना कोणी दिसलं नाही. 


त्या खोलीत एक कूलर होता, त्यांना तो कूलर बाजूला करायचा प्रयत्न केला तर तो जड वाटला. त्यांनी मग त्या कूलरचा मागची बाजू पुढे केली तर त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. कारण त्या कूलरच्या आत त्यांच्या सूनेचा प्रियकर लपवून बसला होता. कोणीही कल्पना केली नसले अशा ठिकाणी त्या सूनेने आपल्या बॉयफ्रेंडला लपवलं होतं. पण त्याची ही भानगड सासूसमोर उघड झाली. हे पाहून सासूने सुनेला खूप काही सुनवलं. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पण हा व्हिडीओ जुना असून पुन्हा एकदा सोशल मीडियावर पाहिला जातोय. 



या व्हिडीओवर सोशल मीडियावर नेटकर तुफान कमेंट्स करत आहेत.  एका यूजरने लिहिलंय की, तो कुलरच्या आत लपून बसला नव्हता, तर कूलरची दुरुस्ती करत होता. तर एका यूजरने लिहिलंय की, प्रेमी युगुलांसाठी लपण्याची नवीन जागा सापडली आहे. या व्हिडीओ लाखो व्ह्यूज मिळाले आहे.