नवी दिल्ली : माणूसकीला काळीमा फासणारी एक घटना समोर आली आहे. कर्नाटकात एका मुलीने ९० वर्षांचे वडील आणि ८० वर्षांची आई यांना घराबाहेर काढल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. घराबाहेर काढलेले आई-वडील बस स्डॅंटवर राहतात.


काय आहे हे प्रकरण?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हाती आलेल्या माहितीनुसार, ९० वर्षीय सुर्यकांत आणि त्यांची ८० वर्षीय पत्नी कमलमा काही दिवसांपूर्वी हुबली येथे एका मंदिरात आले होते. तेथे सेवा केल्यानंतर ते आपल्या मुलीकडे गेले. मात्र काही दिवस राहिल्यानंतर मुलीने त्यांना घराबाहेर काढले.


बस स्टॅंडवर ठाण


या दांपत्याकडे काहीच नसल्यामुळे त्यांनी हुबळी बस स्टॅंडवर ठाण मांडले. दोन दिवस ते तिथेच राहिले. त्यांना तेथे पाहुन आजूबाजूच्या लोकांनी विचारपूस केली. त्यानंतर त्यांनी सगळी कहाणी सांगितली. बस स्टॅंडवर प्रवाशांशी बोलत असताना परिवहन निगम आणि रिक्षा चालकांनी सुर्यकांत यांचे बोलणे ऐकले. 



पुन्हा बस स्टॅंडचा आधार


एका अधिकाऱ्याने मीडियाला सांगितले की, मी सकाळी येथे आलो तेव्हा हे दांपत्य थंडीने कापत होते. त्यांच्याशी बोलल्यावर कळले की, त्यांच्या मुलीने त्यांना घराबाहेर काढले आहे. त्यानंतर अधिकारी आणि ऑटो चालक त्यांना वृद्धाश्रमात घेऊन गेले. घरातून अचानक निघाल्यामुळे त्यांच्याकडे आयडी नव्हते. त्यामुळे त्यांनी वृद्धाश्रमात दाखल करून घेण्यास नकार दिला. परिणामी त्यांना पुन्हा बस स्टॅंडचा आधार घ्यावा लागला. 



पोलीसांनी काढला तोडगा


याप्रकरणी पोली५सांना कळविण्यात आले. पोलीसांनी सुर्यकांत आणि त्यांच्या पत्नीला सरकारी वृद्धाश्रमात पोहचवले. मात्र त्या दांपत्याने तक्रार दाखल केली की नाही, याबद्दल काही माहिती मिळाली नाही.