`दाऊद भारतात परत यायला तयार`
मुंबई बॉम्बस्फोटाचा मुख्य सूत्रधार आणि अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम भारतात परण्याच्या चर्चेला पुन्हा एकदा उधाण आलंय.
मुंबई : मुंबई बॉम्बस्फोटाचा मुख्य सूत्रधार आणि अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम भारतात परण्याच्या चर्चेला पुन्हा एकदा उधाण आलंय. दाऊदचे वकील श्याम केसवाणी यांनी दाऊद भारतात येण्यास तयार असल्याचं संगितलंय. कितीही खटले चालवा मात्र आपल्याला मुंबईतल्या आर्थर रोड जेलमध्ये ठेवण्यात यावं अशी दाऊदची मागणी असल्याचंही केसवाणींनी जेठमलानींचा हवाला देऊन सांगितलं.
तर काही राजकारण्यांचं बिंग फुटणार असल्यामुळेच दाऊदला भारतात येऊ देण्यास अडथळे निर्माण करत असल्याचा आरोपही केसवाणींनी केलाय. तर दाऊद शरणागती पत्करणार असल्याचं केसवाणींचं वक्तव्य खोडसाळपणाचं असल्याची टीका विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी केलीय.